आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला

:

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच दैनंदिन दिनचर्येचे नियोजन करा. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामातही यश मिळण्याची शक्यताआहे. रागावर नियंत्रण ठेवा.उत्पन्न वाढेल त्‍याचबरोबर खर्चही वाढेल. बाहेरच्या लोकांना तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू देऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील.
वृषभ: आज जवळच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. अहंकारावर आणि अतिआत्मविश्वास टाळा. तुमच्‍या ऊर्जचा सकारात्मक पद्धतीने वापरा करा. चांगले कार्य सुरू ठेवा, अशी सूचना श्रीगणेश करतात. पती-पत्नीचे नाते मधूर होईल. सांधेदुखीची जुनी समस्या वाढू शकते.
मिथुन : आज कुटुंबातील ज्‍येष्‍ठांनी केलेले मार्गदर्शन तुमच्‍यासाठी फायदेशीर ठरेल. सार्वजनिक व्यवहाराशी संबंधित कामात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. काही काळापासून कुटुंबात सुरू असलेले गैरसमज कोणाच्यातरी हस्तक्षेपाने दूर होईल. तुमच्‍या क्षमतेवर यश मिळवाल. चिडचिडेपणा आणि तणाव तुमच्या कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकतो. कठोर परिश्रमाची वेळ आहे आळस टाळा. विद्यार्थी करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करतील. मौजमजेत वेळ व्‍यतित करु नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.
कर्क : आजचा दिवस तुमच्या वैयक्तिक कामांसाठी सकारात्‍मक ठरेल. घरगुती वस्तूंची ऑनलाइन खरेदीही कराल. कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासाठी शुभ ठरेल, असे श्रीगणेश सांगतात. विचारांवर नियंत्रित ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य कायम राहील. शेजाऱ्यांशी वाद घालू नका.कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक सहली टाळणे चांगले राहिल. पती-पत्नी परस्पर समंजसपणाने कौटुंबिक समस्या सोडवू शकतात. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीला सदस्याच्या आरोग्याची काळजी राहिल.
सिंह: आजचा बहुतांश वेळ वैयक्तिक आणि कौटुंबिक कामे पूर्ण करण्यात व्यतीत होईल. व्यवहार कौशल्यामुळे तुमचा सामाजिक कार्यात दबदबा कायम रहिल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाबाबत जागरूक राहावे. अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. जमिनीची खरेदी-विक्री सध्या टाळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. मंदीच्या काळात व्यवसायिक कामे व्यवस्थित राहतील. घरात शांतता आणि शांतीचे वातावरण असू शकते. सर्दी, ताप यासारख्या समस्यांमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होऊ शकते.
कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. विरोधी पक्षचा प्रभाव वाढेल; पण तुमचे नुकसान करणार नाही. मुलांचा अभ्यास आणि करिअरशी संबंधित महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. खर्चामुळे आर्थिक ताण येईल. संयम ठेवा. जोखमीच्या कामात गुंतवणूक करू नका. व्यवसायाप्रती अधिक गांभीर्य आणि मेहनत घ्यावी लागेल. तुमचा जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ व्‍यतित कराल. नकारात्‍मक कामात सक्रीय असणार्‍यांपासून लांब राहा.
तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. नवीन वाहन घेण्‍यासाठी योग्‍यवेळ आहे. इतरांच्‍या कामांमध्‍ये ढवळाढवळ योग्य ठरणार नाही. याचा तुमच्या आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुलांच्या समस्या ऐका. त्‍यावर उपाययोजना शोधा. कोणत्याही व्यावसायिक सहली टाळणे चांगले. घरातील वातावरण आनंदाने राखता येईल. आरोग्य चांगले राहिल.
वृश्चिक: आज कोणताही वाद संवादाने सोडवला जाऊ शकतो. हितचिंतकाचे आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यकारक ठरतील. मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. खर्च अधिक होईल. कोणालाही वैयक्तिक बाबींवर अनाठायी सल्ला देऊ नका, अन्यथा तुमची बदनामी होऊ शकते. जवळच्या नातेवाईकाला मदत करण्यापूर्वी तुमच्या बजेटचाही विचार करा. व्यवसाय वाढवण्यासाठी भागीदारीसंदर्भात तुमचा निर्णय सकारात्मक असेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय राखाल.
धनु : ग्रहस्थिती अनुकूल आहे. तुमची क्षमता आणि प्रतिभा यांच्‍या समन्‍यवयातून प्रगतीचा मार्ग सापडेल. इतरांवर अवलंबून न राहता आपल्या योग्यतेवर विश्वास ठेवा. अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. आर्थिक प्रश्‍नांवरुन वाद निर्माण होऊ शकतात. व्यवसाय व्यवस्थेत केलेल्या कामात योग्य फळ मिळेल. तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबींमध्ये बाहेरच्या व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. ताप आणि सर्दीचा त्रास होण्‍याची शक्‍यता.
मकर : आजचा दिवस सामान्य असेल. तुमच्या क्षमतेनुसार काम करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामाचा ताण जास्त असेल पण योग्य परिणाम मिळाल्याने थकवा विसरुन जाल. तुमच्या योजना सुरू करण्यात काही अडचणी येतील. युवा वर्गाने फायद्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबू नये. व्यवसायातील सर्व निर्णय आपल्यासाठी घ्या. पती-पत्नीमध्ये योग्य समन्वय राखला जाईल. मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आज तुमचा मनोरंजन आणि विश्रांतीच्या कार्यात चांगला वेळ जाईल. कोणत्याही धार्मिक संस्थेत तुमचे योग्य योगदान असेल. कुठूनही चांगली बातमी येऊ शकते. कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि पूर्ण संयमाने घेण्याचा प्रयत्न करा. जास्त काम केल्याने तुमच्यावर ताण येईल. तुमच्या कल्‍पना वास्‍तवात आणण्याचा प्रयत्न करा. अधिक कमाई करण्याचा एक मार्ग आहे. घरातील कोणत्याही समस्येवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या जाणवू शकते.
मीन: श्रीगणेश म्हणतात की, आज प्रलंबित काम मार्गी लागल्‍याने दिलासा मिळेल. सामाजिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. धार्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवा. वादापासून लांब राहा. भावांसोबत चांगले संबंध ठेवा. प्रवास करणे टाळा. क्षेत्रात कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घ्या. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू शकते. विशेषतः महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक असायला हवे.