विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा तारखांमध्ये मुदतवाढीनंतरही बदल नाही !
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 20 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ देऊनही विद्यापीठातर्फे पदवी प्रवेशासाठी दि. 13 जून रोजी, तर पदव्युत्तरसाठी दि. 14 ते दि. 16 जून या दरम्यान ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाच्या विविध विभाग, केंद्र आणि प्रशाळांमध्ये विविध पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. 20 एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेची मुदत 20 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आणखी 10 दिवस अर्ज करता येणार आहेत. पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलेली असावी, तर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान आवश्यक गुणांसह पदवीधर पदवी धारण केलेली असावी, असे पात्रतेचे निकष आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबत हीींिीं:///लर्रािीीर्.ीपर्ळिीपश.रल.ळप/उउएझ/ ङेसळप.रीिु या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा
शरद पवारांसाठी काँग्रेसचे रेड कार्पेट
‘108’चा साडेपाच लाख रुग्णांना लाभ; नवसंजीवनी सेवेची दशकपूर्ती
काळजी घ्या! राज्यात 16 मेपर्यंत ‘यलो अलर्ट’