परभणी: कात्नेश्वर येथे उष्माघाताने भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : उष्माघातामुळे एका भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा शनिवारी (दि.११) मृत्यू झाला. पूर्णा तालूक्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला. पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथे राहणारे  भाजीपाला उत्पादक शेतकरी भानुदास मुंजाजी चापके (वय५४) असे मृताचे नाव आहे. चापके हे संदलापूर शिवारात गट क्रमांक १५ मध्ये दीड- दोन एकरातील काही क्षेत्रात ते भाजीपाल्याचे उत्पादन करत होते. … The post परभणी: कात्नेश्वर येथे उष्माघाताने भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

परभणी: कात्नेश्वर येथे उष्माघाताने भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा : उष्माघातामुळे एका भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा शनिवारी (दि.११) मृत्यू झाला. पूर्णा तालूक्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला. पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथे राहणारे  भाजीपाला उत्पादक शेतकरी भानुदास मुंजाजी चापके (वय५४) असे मृताचे नाव आहे. चापके हे संदलापूर शिवारात गट क्रमांक १५ मध्ये दीड- दोन एकरातील काही क्षेत्रात ते भाजीपाल्याचे उत्पादन करत होते. (Parbhani News)
आठवड्यातील प्रत्येक शनिवारी कात्नेश्वर येथे बाजार भरत असल्यामुळे, ते शेतातील उत्पादित भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आणून विकत होते. शनिवारी पूर्णा तालुक्यामध्ये तापमान ४१ अंशावर गेले होते. बाजारात भाजीपाला विक्री करत असतानाच दुपारी २ च्या सुमारास, त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर ते बाजारातून थेट आपल्या घरी गेले. नातेवाईक त्यांना तातडीने गावातील रुग्णालयात घेवून गेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे कात्नेश्वर गावात शोककळा पसरली आहे. (Parbhani News)
हेही वाचा : 

संशयकल्लोळ! ‘गॅस लायटिंग’ला लाईटली घेऊ नका
जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, सुरेशदादा जैन यांचा भाजपला पाठिंबा
क्राईम डायरी- शरीरसुखास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा आवळला

Latest Marathi News परभणी: कात्नेश्वर येथे उष्माघाताने भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.