नांदेड : धर्माबाद- कंदकुर्ती मार्गावर अपघात; दुचाकीस्वार ठार, एक जखमी
धर्माबाद; Bharat Live News Media वृत्तसेवा: धर्माबाद- कंदकुर्ती महामार्गावर रोहित बारच्या समोर बोलोरो पिकअप् गाडीची धडक लागून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाला. ही घटना आज (दि. ११) दुपारी घडली.
विनोद माधवराव मिनके (वय ३३, रा. रावधानोरा, ता. उमरी) असे मृताचे नाव आहे. तर दतात्रेय भुमा कंठे (वय २२, रा. बेलूर (बु), ता. धर्माबाद) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धर्माबाद – कंदकुर्ती महामार्गावर (एम एच २६ बी पी५३०८) या दुचाकीला (एमएच २२ए एन १७९८) पिकअप वाहनाने जोराची धडक दिली. यात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. एकजण जखमी झाला. त्याला रुग्णालयात हालविण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा
नांदेड : गोदावरी नदीपात्रात क्रुझर कोसळून दोघांना जलसमाधी
नांदेड: किनाळा येथे वऱ्हाडाचा टेम्पो उलटून १७ जण गंभीर जखमी
नांदेडमध्ये मलाबार ज्वेलर्सच्या शोरूमला भीषण आग
Latest Marathi News नांदेड : धर्माबाद- कंदकुर्ती मार्गावर अपघात; दुचाकीस्वार ठार, एक जखमी Brought to You By : Bharat Live News Media.