Breaking ! पुण्यात एकच खळबळ, एनडीए परिसरात आढळला बॉम्ब..!
पुणे : Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पुण्यातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान BDDS पथकाने बॉम्ब निकामी केला असला तरी सुरुवातीला याची माहिती सगळीकडे पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या परिसरात कमळा देवी मंदिरामागे एका पुलाचे काम सुरू असून हे काम सुरू असताना तिथे हॅन्ड ग्रॅनाईट आढळल्याची माहिती मिळाली.
बॉम्बची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक अनुसे, एटीसी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी BDDS पथकाला पाचारण केले. सदरची वस्तू धोकादायक असल्याचे लक्षात योता पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 यांच्या परवानगीने हे ग्रेनाईट नष्ट केले आहे. याबाबतची माहिती उत्तम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख यांनी दिली आहे.
हेही वाचा
खूर असणार्या प्राण्यांच्या पूर्वजाचे मिळाले जीवाश्म
पदव्युत्तर पदवी वैद्यकीय प्रवेशाच्या जागा वाढल्या..!
Menstruation and Stomach Pain : मासिक पाळी आणि पोटदुखी