अक्षय्यतृतीयेला कोट्यवधींची उलाढाल!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूरकर ग्राहकांनी खरेदीचा ‘सुवर्णयोग’ साधला. सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी, चारचाकी, मोबाईल फोन्स, गृहोपयोगी वस्तू यांच्यासोबतच घर खरेदी आणि रियल इस्टेट, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचा ओघ होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील शोरुम्स आणि सर्वच व्यावसायिक विविध योजनांसह सज्ज होते. त्यामुळे बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली. सोने-चांदीची चमकदार उलाढाल : …

अक्षय्यतृतीयेला कोट्यवधींची उलाढाल!

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूरकर ग्राहकांनी खरेदीचा ‘सुवर्णयोग’ साधला. सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी, चारचाकी, मोबाईल फोन्स, गृहोपयोगी वस्तू यांच्यासोबतच घर खरेदी आणि रियल इस्टेट, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचा ओघ होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील शोरुम्स आणि सर्वच व्यावसायिक विविध योजनांसह सज्ज होते. त्यामुळे बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली.
सोने-चांदीची चमकदार उलाढाल : अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर अनेकांनी सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात धाव घेतली. त्यामुळे शहरातील शोरुम्समध्ये ग्राहकांची दिवसभर गर्दी होती.
सोने आणि चांदीचे दर : दिवाळीपासून सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ अक्षय्यतृतीयेलाही कायम होती. 24 कॅरेट सोने प्रतितोळा 74 हजार 900 रुपये आणि चांदी प्रतिकिलो 86 हजार 200 रुपये (जीएसटीसह) या दराने विकली जात होती.
रियल इस्टेट आणि वाहन बाजारातही उत्साह : अक्षय्यतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नवीन घर खरेदी करण्याचे स्वप्न अनेकांनी पूर्ण केले. फ्लॅट, रो-हाऊस आणि प्लॉट खरेदीसाठीही ग्राहकांची गर्दी होती. वाहन बाजारातही नवीन गाडी खरेदी करणार्‍यांची संख्या मोठी होती. वाहनांच्या बहुतांश शोरुम्समध्ये वाहनांच्या डिलिव्हरीसाठी खास सोय केली होती. दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीसाठीही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
अक्षय्यतृतीये दिवशी घरी न्यायच्या म्हणून सुमारे 1,800 दुचाकी आणि 500 कारचे बुकिंग झाले होते. सर्वच शोरुममध्ये वाहने घरी घेऊन जाण्यासाठी अनेकजण सहकुटुंब आले होते. मुहूर्तावर बहुतेक मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या शोरुम्सनी ग्राहकांसाठी ऑफर जाहीर केल्या होत्या. त्या ऑफरवर ग्राहकांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या. सर्वच मोबाईल दुकाने गर्दीने ओसंडून वाहत होती. त्यांनी जाहीर केलेल्या ऑफरला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच फायनान्सकडून सुलभ हप्त्यावर, नाममात्र दैनिक हप्त्यावर मोबाईल उपलब्ध होत असल्याने त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.