पलूस-कडेगाव मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत २६.८० टक्केच मतदान

पलूस : पुढ‍ारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीसाठी पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदार संघात गावागावात मतदारांच्यात उत्साह दिसून येत होता. मात्र शहराच्या ठिकाणी एवढा उत्साह दिसत नव्हता. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत केवळ २६.८० टक्केच मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया शांततेत सुरु ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज दिसत होती. मतदार संघात महायुतीचे …

पलूस-कडेगाव मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत २६.८० टक्केच मतदान

पलूस : पुढ‍ारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीसाठी पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदार संघात गावागावात मतदारांच्यात उत्साह दिसून येत होता. मात्र शहराच्या ठिकाणी एवढा उत्साह दिसत नव्हता. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत केवळ २६.८० टक्केच मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया शांततेत सुरु ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज दिसत होती.
मतदार संघात महायुतीचे संजयकाका पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात चुरशीची तिरंगी लढत होत आहे. तर ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा तालुक्यात दौरा केला होता. त्यामुळे ते किती मतदान घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारांना बाहेर काढण्यासाठी तिन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते दिवसभर प्रयत्न करीत होते. मात्र सध्या कडक उन्हाचा तडका असल्याने मतदारांच्यात फारसा उत्साह दिसत नव्हता.
निवडणूक विभागाने आदर्श युवा मतदान केंद्राची स्थापना केली. यामध्ये मतदान केंद्राबाहेर मंडप, बसायला खुर्ची आदींची व्यवस्था केल्याने सदर मतदान केंद्र लक्षवेधक ठरले होते. मतदान केंद्राबाहेर मंडप टाकून तसेच स्वागत गेट उभारून मतदान केंद्र सजविण्यात आले होते. मतदान कक्षा समोरील परिसराची रांगोळीने सजावट करण्यात आली होती.
सकाळी ९ वाजेपर्यंत ३.९२ टक्के तर ११ वाजेपर्यंत १३.५३ टक्के मतदान झाले होते. १ वाजेपर्यंत हा आकडा २६.८० टक्क्यावर गेला होता. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदान प्रक्रिया शांततेत सुरु होती.
हेही वाचा : 

लोकसभा निवडणुकीनंतर दोन पक्ष संपणार; पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत

ब्रेकिंग न्‍यूज : केजरीवालांना तूर्तास ‘सर्वोच्‍च’ दिलासा नाही, अंतरिम जामिनावरील सुनावणी लांबणीवर

Lok Sabha Election 2024 | इस्लामपूरमध्ये धैर्यशील माने- सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, नेमकं काय घडलं?