परभणी: गोविंदपुरात शेती कर्जाला कंटाळून तरुणाने जीवन संपविले

परभणी: गोविंदपुरात शेती कर्जाला कंटाळून तरुणाने जीवन संपविले

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: तालुक्यातील गोविंदपूर येथील एका शेतक-याच्या मुलाने वडिलांनी बँकेचे घेतलेले कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने वैफल्यग्रस्त होवून रेल्वेखाली उडी मारुन जीवन संपविले. ही घटना ७ मेरोजी सकाळी उघडकीस आली.  चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि नरसिंग पोमनाळकर, जमादार गजानन गवळी, शिपाई विलास मिटके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील गोविंदपूर येथील राजू शिवाजीराव चौधरी (वय ३७) या युवकाने सोमवारी (दि.६) रात्री १० वाजता ते आज ५ वाजेदरम्यान गावाजवळून गेलेल्या पूर्णा – नांदेड लोहमार्गावर रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपविले.
मृत राजू चौधरी यांचे वडील शिवाजीराव चौधरी यांनी काही वर्षापूर्वी एका राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेतले होते. ते वडिलांना फेडता येत नव्हते. त्यामुळे त्यांने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे गोविंदपूर गावावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास जमादार गजानन गवळी करीत आहेत.
हेही वाचा 

परभणी हादरले..! प्रेमसंबंधास विरोध करत आई-बापाने केला पोटच्‍या मुलीचा खून, मृतदेहही जाळला
परभणी: जिंतूर येथे हॉटेल मालक, नोकरांच्या मारहाणीत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; ४ जणांना अटक
परभणी : पूर्णेत रेल्वे कर्मचाऱ्याचा घरात आढळला मृतदेह