लोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान सुरू

लोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान सुरू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (दि.७) १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यातील सुरत येथे काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाला आणि नंतर ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत.जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे अनंतनाग-राजौरी मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या मतदारसंघात सहाव्या टप्प्यात २५ में रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात असलेल्या बैतुल (मध्य प्रदेश) मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराच्या निधनामुळे हे मतदान तिसऱ्या टप्प्यात म्हणजे आज होत आहे. ७ केंद्रीय मंत्री आणि ५ माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

२ कोटी मतदारांच्या हाती २५८ उमेदवारांचे भवितव्यराज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी आज ७ मे रोजी कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आदी ११ लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. या ११ मतदारसंघांत एकूण २ कोटी ९ लाख ९२ हजार ६१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, २५८ उमेदवारांचे भवितव्य त्यांच्या हातात आहे.