Kolhapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Kolhapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

चंदगड, Bharat Live News Media वृत्तसेवा : रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या रवींद्र प्रभाकर सबनीस (वय ६५, रा. यशवंतनगर ता. चंदगड) यांना दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकीमध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.५) रोजी रात्री ८ वाजता बेळगाव- वेंगुर्ला रस्त्यावर घडला. (Kolhapur News)
सबनीस हे मजरे कारवेहून आपल्या यशवंतनगर गावी चालत जात होते. तर कालकुंद्री (ता. चंदगड) येथील निखिल हेमंत कांबळे हा, आपल्या (केए २२, इआर २६५३ ) या दुचाकीवरून कारवेपासुन आपल्या कालकुंद्री गावाकडे सुसाट जात होता. दरम्यान चालत जाणाऱ्या सबनीस यांना पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत सबनीस हे हवेत उडून रस्त्यावर आपटले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ बेळगावच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र २ तासांच्या उपचारानंतर सबनीस यांचा मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या गावी हळहळ व्यक्त होत आहे. (Kolhapur News)
हेही वाचा :

पालकांनी मुला-मुलींना चांगले शिक्षण देण्यावर भर द्यावा : न्यायाधीश संदिप स्वामी
12th ISC Board : ठाण्यातील रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला
अरविंद केजरीवालांची राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे चौकशी करा : नायब राज्यपाल

Latest Marathi News Kolhapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.