कोल्हापूर : दोन शाळकरी मुलींसह एकाचा तलावात बुडून मृत्यू

कोल्हापूर : दोन शाळकरी मुलींसह एकाचा तलावात बुडून मृत्यू

चंदगड; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील करेकुंडी येथील तलावात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलींसह एका सेवानिवृत्त जवानाचा आज (दि.६) बुडून मृत्यू झाला. विजय विठोबा शिनोळकर ( वय ४२ ), चैतन्या नागोजी गावडे ( वय १२ रा. आसगाव ता. चंदगड ) आणि समृद्धी अजय शिनोळकर ( वय १०, रा. करेकुंडी, सद्या रा. वैताकवाडी, ) अशी मृतांची नावे आहेत.
सेवानिवृत्त जवान विजय शिनोळकर हे गावानजीकच्या पाझर तलावाजवळ नात्यातील दोन शाळकरी मुलींसह पोहायला गेले होते. यावेळी तलावात पोहत असलेल्या दोन्ही मुलींची दमछाक झाली. व त्या बुडाल्या. त्यांना वाचवताना विजय हेही पाण्यात बुडाले. यावेळी तेथे कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ घडला. सायंकाळी तलावाच्या काठावर गावातील एकाला कपडे दिसून आले. त्यानंतर तिन्ही मृतदेह ग्रामस्थांनी पाण्याबरोबर काढले. उन्हाळी सुट्टीनिमित्त चैतन्या व विजय यांची पुतणी समृद्धी गावी आल्या होत्या. तिघेही पोहायला गेल्यानंतर ही दुदैवी घटना घडली. मृतदेह पाण्याबाहेर काढताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. विजय यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा : 

कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
Kolhapur : थेट पाईपलाईनचा धोकादायक व्हॉल्वचा वाहतुकीस आडथळा
धक्कादायक ! पिरंगुट घाटात वर्‍हाडाच्या बसने घेतला पेट; जीवितहानी नाही

Latest Marathi News कोल्हापूर : दोन शाळकरी मुलींसह एकाचा तलावात बुडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.