धुळ्यात उद्या उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- धुळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्या (दि. 7) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. या सभेमधून उद्धव ठाकरे नेमके काय बोलतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून असल्याची माहिती आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी असणाऱ्या कार्यालयात आज पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार कुणाल पाटील, डॉक्टर बच्छाव, शिवसेनेचे संपर्क नेते अशोक धात्रक, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे तसेच शिवसेनेचे माजी महापौर भगवान करणकाळ, महेश मिस्त्री, ललित माळी, काँग्रेसचे रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, डॉक्टर एस टी पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी माहिती देताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, धुळे शहरातील जेलरोडवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली आहे. दुपारी तीन वाजेला होणाऱ्या या सभेची तयारी केली जाते आहे. या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यादेखील उपस्थित राहणार असून महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील स्थानिक नेते देखील या सभेला संबोधन करणार असल्याची माहिती देण्यात आली.
त्याचप्रमाणे शिवसेनेचे संपर्क नेते अशोक बच्छाव यांनी भारतीय जनता पार्टीवर टीकेची तोफ डागली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने चुकीची माहिती सभांमधून देत आहेत. तर भारतीय जनता पार्टी ही खोटे बोलते आहे. मात्र जनता त्यांना मतदान यंत्रामधून उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पुढील कालावधीमध्ये बागलाण येथे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची सभा होणार असून मालेगाव शहर आणि धुळ्यात खासदार इम्रान प्रतापगढी यांची देखील सभा होणार आहे अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.
हेही वाचा –
Rajan Vichare on Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटाचे खरे दिग्दर्शक तुम्हीच, मग चित्रपट खोटा कसा ? : राजन विचारे
Lok Sabha Election 2024 | शांतिगिरी महाराजांच्या माघारीचे प्रयत्न अयशस्वी, अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात कायम
Latest Marathi News धुळ्यात उद्या उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार Brought to You By : Bharat Live News Media.