भावासाठी NEET परीक्षा देणार्‍या ‘एमबीबीएस’च्‍या विद्यार्थ्याला अटक

भावासाठी NEET परीक्षा देणार्‍या ‘एमबीबीएस’च्‍या विद्यार्थ्याला अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : बिहार-झारखंडसह राजस्थानमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत NEET मध्ये फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बाडमेरच्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणारा तरुण त्याच्या भावाच्या वतीने परीक्षेला बसताना पकडला गेला आहेबाडमेर जिल्हा मुख्यालयातील एका सरकारी शाळेत बनावट उमेदवार भगीरथ त्याच्या भावाच्या जागी परीक्षेला बसला होता. संशयाच्या आधारे पर्यवेक्षकाने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी प्रथम बनावट उमेदवाराला आणि नंतर त्याच्या भावाला अटक केली. सध्या पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
बारमेर जिल्हा मुख्यालयातील 8 परीक्षा केंद्रांपैकी एक असलेल्या अंतरी देवी शाळेतील निरीक्षकांना भगीरथ नावाच्या तरुणावर संशय आला. निरीक्षकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी भगीरथ राम याला ताब्‍यात घेतले. चौकशी केली असता भगीरथ त्याचा धाकटा भाऊ गोपाल राम याच्या जागी डमी उमेदवार असल्याचे भासवून बनावट पद्धतीने परीक्षा देत असल्याचे समोर आले. कोतवाली पोलिसांनी प्रथम भगीरथ आणि नंतर त्याचा भाऊ गोपाल राम या दाेघांना परीक्षा केंद्रातून अटक केली. दोन्ही भाऊ सांचोर जिल्ह्यातील मेघावा गावचे रहिवासी आहेत. सध्या दोघांची चौकशी सुरु आहे.
मागील वर्षी संशयित NEET परीक्षा उत्तीर्ण
पोलिस चौकशीत समोर आले आहे की, आरोपी भगीरथ राम जोधपूर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. 2023 मध्ये ताे NEET परीक्षेत पात्र ठरला हाेता. आता आपल्या लहान भावाला डॉक्टर बनवण्याच्या उद्देशाने तो डमी उमेदवार म्हणून त्याच्या जागी परीक्षा देण्यासाठी आला होता.
आरोपीने गुन्ह्याची दिली कबुली : पोलीस
बाडमेरचे अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक (एएसपी) जसाराम बोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगीरथ राम त्याचा भाऊ गोपाल रामच्या जागी परीक्षा देण्यासाठी आला होता. पोलिसांनी भगीरथ राम आणि त्याचा भाऊ गोपालराम या दोघांनाही अटक केली असून, भगीरथने आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
हेही वाचा : 

NEET 2024 : दूरस्थ शिक्षण घेणाऱ्यांनाही ‘नीट’ची परीक्षा देता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
NEET Exam : प्रेरणादायी..! मुलीसाेबत न्यूरो सर्जन वडिलांनीही दिली ‘नीट’, दोघांच्‍या गुणांत केवळ…