Stock Marke : बाजारात आशा-निराशेचा खेळ

Stock Marke : बाजारात आशा-निराशेचा खेळ

भरत साळोखे, संचालक अक्षय प्रॅफिट अँड वेल्थ प्रा. लि.

लोकसभा निवडणूक निकालांची तारीख जवळ येईल तशी बाजारातील संदिग्धता वाढेल, असे गेल्याच आठवड्यात लिहिले होते. गत सप्ताहातील बाजारातील चित्र पाहिल्यास याची खात्री पटावी. बुधवारी 1 मेची सुट्टी असल्याने आठवड्यात चार दिवस ट्रेडिंग होते. त्यापैकी दोन दिवस बाजार रेड ओनमध्ये, तर दोन दिवस ग्रीन झोनमध्ये बंद झाला. त्यातही निफ्टीने दोन वेळा 22800 च्या मजबूत तटबंदीला धडक देण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही वेळा तो अयशस्वी ठरला. 30 एप्रिल रोजी 22783.35 आणि 3 मे रोजी 22793.90 हे दोन उच्चांक मात्र निफ्टीने प्रस्थापित केले. 23000 चा टप्पा ओलांडून 25000 च्या दिशेने प्रवास सुरू करण्यास निफ्टी उत्सुक आहे. सेन्सेक्सने अगोदरच पाऊण लाखाचा टप्पा पार केला आहे.
शुक्रवारच्या Market Crast मागे लोकसभा निवडणूक निकालांची अनिश्चितता, कंपन्यांचे Q 4 चे आर्थिक निकाल आणि बाजारात वाढलेले Margin Funding ही तीन कारणे होती.
कोणत्याही देशातील मध्यवर्ती शासन हे देशाचे वित्तीय धोरण आणि करप्रणाली ठरवत असते. त्यापुढे कॉर्पोरेट कंपन्यांची आर्थिक कामगिरी त्यावर अवलंबून असते; परंतु आता मार्केटमधील वाढल्या Volatility मागे, विशेषतः सप्ताहाच्या अखेरीस म्हणजे शुक्रवारी जो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. Sell-off होतो. त्याला Margin Funding कारणीभूत आहे, हे स्पष्ट होत आहे. त्याविषयी थोडक्यात बोलू.
Margin Trading Funding (MTF) म्हणजे काय?
तर गुंतवणूकदारांना, विशेषतः टे्रडर्सना मिळणारी ही एक कर्जसुविधा आहे, जी त्यांना त्यांच्या ब्रोकरकडून मिळत असते. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे वेगळे खाते काढावे लागत नाही, तर तुमच्या आहे त्याच डीमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंटमध्ये ही सुविधा मिळते. शेअर्स खरेदीसाठी हे Margin Funding होत असते. थोड्या मार्जिन अमाऊंटमध्ये टे्रडर्स त्यांना हवे ते शेअर्स घेऊ शकतात. अर्थात, कोणत्या शेअर्सना Funding करायचे, त्याची यादी सेबीने प्रसिद्ध केलेली असते. हे Funding किती दिवसांसाठी आणि कोणत्या व्याजदराने करायचे, हे ब्रोकर आणि ग्राहकांच्या दरम्यान असणारे व्यावसायिक संबंध ठरवतात.
ही झाली Margin Trading Funding ची थोडक्यात माहिती. आता घ्या (MTF) मुळे बाजारात Volatility कशी वाढते. तर (MTF) वापरून आपण घेतलेले शेअर्स ठरावीक दिवसांनी (शक्यतो 5 दिवसांनी किंवा मार्केटच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी) Square – eff करावे लागतात. हे MTF चे प्रमाण किीती वाढावे? तर मार्च 2020 अखेर MTF चा आकडा होता रु. 7100 कोटी आणि तोच आकडा मार्च 2024 अखेर रु. 57101 कोटी झाला आहे.
केवळ चार वर्षांत 7 पटींहून अधिक वाढ!
निवडणुकींच्या दरम्यान किंवा इतरही काही कारणांमुळे बाजारामध्ये अनिश्चितता असेल, तर अशा वेळी गुंतवणुकीसाठी मल्टीअ‍ॅसेट फंडस् हा एक अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो. या फंडांमधील गुंतवणूक Equity, Debt आणि Commodities या तीनही Asset Classes मध्ये होते. या फंडांचे फंड मॅनेजर्स हे सर्व क्षेत्रांचा सखोल अभ्यास असणारे असतात. Market Conditions आणि Economic Indicutors यांचा अभ्यास करून ते गुंतवणुकीचे प्रमाण ठरवतात. त्यामुळे कधीही Mutti Asset Funds मधील गुंतवणूक ही आपली Strategic Move ठरते. या फंडांची कामगिरी आणि त्यांची वाढती लोकप्रियता पाहून बर्‍याच अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी त्यांचे फंडस् सुरू केले आहेत.
Stock market
गत सप्ताहात बुधवारी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला. Amfi (Association of mutual Funds in india) च्या आकडेवारीनुसार, मार्च 2024 अखेर म्युच्युअंल फंड व्यवसाय खालीलप्रमाणे
Total Net Assets – Rs. 55,00,728 Cr.
Total SIP AUM – Rs 10, 71, 666 Cr.
वरती महाराष्ट्र दिनाचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्र हे सर्वार्थाने पुढारलेले राष्ट्र असल्याचा अभिमान आपण नेहमीच बाळगतो. आता वरील भारतातील म्युच्युअल फंडस्मधील गुंतवणुकीतील भारतातील आघाडीच्या सात राज्यांची आकडेवारी पाहा :
Stock market
हेही वाचा :

कुलूप ते रिअल इस्टेट…! १२७ वर्षांनंतर गोदरेज कुटुंबात वाटणी, नेमकं काय झालं?
गृहकर्ज अगोदरच फेडावे की गुंतवणूक सुरू ठेवावी?
Whisky बनवणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सला रोज लागतंय अप्पर सर्किट! कारण काय?