शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा जगातील सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवारांचा आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित करत  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.२५) शरद पवारांवर निशाणा साधला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील …

शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा :  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा जगातील सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवारांचा आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित करत  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.२५) शरद पवारांवर निशाणा साधला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबतीत १० जागा लढविणारे पवार जाहीरनामा देत आहेत, असा आरोप केला आहे.
महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे, असे नमूद करत बावनकुळे म्हणाले, २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, ती पूर्ण केली. शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, ‘खंजीराला’ महत्व आहे. १९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. १९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले. १९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. १९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. २०१९ मध्ये अजित पवारांना शब्द दिला. आणि फिरवला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. आता हा घटनाक्रम पाहता शरद पवारांचा आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा सवाल बावनकुळे यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला.
हेही वाचा :

राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याने मी भाजपचा प्रचार करायला मोकळा : एकनाथ खडसे
Lok Sabha Election 2024 : पूर्णा तालुक्यात १४९०२१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क, निवडणूक विभागाची तयारी पूर्ण
400 पार होणार नाही म्हणणाऱ्या पोपटांना खानदेशी जनता मतदानातून उत्तर देईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस