पाटणामध्ये हॉटेलच्या इमारतीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बिहारची राजधानी पाटणामध्ये एका बहुमजली हॉटेलला आज (दि.२५) सकाळी भीषण आग लागली. सकाळी साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. १२ जखमी असून, सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
हॉटेलला सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. अर्ध्या तासात संपूर्ण इमारतीलचा आगीने आपल्या केवत घेतले. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. इमारतीसमोरील पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, स्टेशन रोडही पूर्णपणे ठप्प झाला. आगीच्या दुर्घटनेनंतर दीड तासानी एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अर्ध्या तासानंतर दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. भीषण आगीत आतापर्यंत सहा जणांचा होपरळून अंत झाला आहे. १५ जण जखमी असून, पाच जण प्रकृती चिंताजनक आहे.
किचनमध्ये लालेल्या आगीने चार मजली इमारतीला कवेत घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर नाश्ता करणाऱ्या लोकांना त्याचा फटका बसला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. आजूबाजूच्या हॉटेल आणि दुकानातील लोक रस्त्यावर आले.
आतापर्यंत 30-35 जणांना सुरक्षितस्थळी हलवले
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधून आतापर्यंत 30-35 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. आग इतकी भीषण आहे की, लोक आत जाण्यास तयार नाहीत. याठिकाणी अग्निशमन दलाच्या पथकाने वाचवलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. जवळपास डझनभर लहान-मोठ्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी हजर आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाल हॉटेलच्या उजव्या बाजूला असलेल्या दोन्ही हॉटेललाही आग लागली. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे.
#WATCH | Patna, Bihar: Krishna Murari, DSP (law & order) says, “5-6 people have died. More than 30 people have been rescued. 7 are seriously injured and have been sent to hospital…” https://t.co/yT6pLszXO2 pic.twitter.com/8P1aq4JNiH
— ANI (@ANI) April 25, 2024