पुढील ४ ते ५ दिवस राज्यात उष्ण लाटेसह अवकाळीचीही शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क: गोवा, कोकणसह राज्यातील काही भागांत शनिवार २७ आणि रविवार २८ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेसह दमट वातावरण राहणार आहे. तसेच आजपासून (दि.२४) पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भातील तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. (Weather …

पुढील ४ ते ५ दिवस राज्यात उष्ण लाटेसह अवकाळीचीही शक्यता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: गोवा, कोकणसह राज्यातील काही भागांत शनिवार २७ आणि रविवार २८ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेसह दमट वातावरण राहणार आहे. तसेच आजपासून (दि.२४) पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भातील तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. (Weather Update)
गोवा, कोकणात २७, २८ एप्रिल रोजी उष्णतेची लाट
उत्तरेकडील गंगेच्या पश्चिम बंगाल, अंतर्गत कर्नाटक, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि किनारपट्टीच्या ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्ण ते गंभीर उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दरम्यान उत्तर प्रदेश बिहार, झारखंड, कोकण आणि गोवा तसेच आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि यानम, रायलसीमा आणि तेलंगणामध्ये शनिवार (दि.२७) रविवार (दि.२८) उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. (Weather Update)
ईशान्य, वायव्य भारतात २६ ते २८ रोजी अवकाळी पाऊस
पुढील ५ दिवसांत पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान ईशान्य भारतात काही ठिकाणी २४, २७ आणि २८ एप्रिल रोजी गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वायव्य भारतात देखील २६ ते २८ एप्रिल दरम्यान गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Weather Update)

24 April, पुढील 4, 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
IMD@imdnagpur @RMC_Mumbai @ClimateImd pic.twitter.com/PpJHIGmNEh
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 24, 2024

Heat wave to severe heat wave conditions likely to continue over East and south Peninsular India during next 5 days. pic.twitter.com/JMKm0OryBd
— India Meteorological Department (@Indiametdept) April 24, 2024

गंगीय पश्चिम बंगाल, आंतरिक कर्नाटक, उप-हिमालयी पश्चिम बंगाल के अलग-अलग स्थानों में उष्ण लहर से लेकर गंभीर उष्ण लहर के रहने की संभावना है, जबकि उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कोंकण और गोवा, तटीय आंध्र प्रदेश और यनम, pic.twitter.com/RU49xma2ic
— India Meteorological Department (@Indiametdept) April 24, 2024

गंगीय पश्चिम बंगाल, आंतरिक कर्नाटक, उप-हिमालयी पश्चिम बंगाल और तटीय ओडिशा के अलग-अलग स्थानों में उष्ण लहर से लेकर गंभीर उष्ण लहर के रहने की संभावना है, जबकि उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कोंकण और गोवा, pic.twitter.com/GJ5r7TWBLB
— India Meteorological Department (@Indiametdept) April 24, 2024

हे ही वाचा:

Heat wave : शनिवारपर्यंत उष्णतेची लाट; हवामान खात्याकडून राज्यासाठी स्पेशल अलर्ट
Heatwave | उष्माघात रोखण्यासाठी केंद्रीय पथक राज्यांत पाठवणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
Heatwave | देशात उष्माघात वाढला, आरोग्यमंत्री मांडविया यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक