Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेसह पाऊसही; हवामान विभागाचा इशारा
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात पावसाचा मुक्काम 25 एप्रिलपर्यंत वाढला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेसह पाऊसही सुरूच राहणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत तसेच कर्नाटक ते कोकण गोवा भागापर्यंत द्रोणीय रेषा तयार झाल्याने वार्याचा वेग वाढून राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे.
गेले पंधरा दिवस विदर्भात सतत पाऊस सुरू आहे. त्यानंतर मराठवाडा भागात पाऊस सुरू झाला. गेले चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. असे असले तरीही राज्याच्या कमाल तापमानात फारसा फरक पडलेला नाही. दिवसभर उन्हाचा दाह अन् सायंकाळी पाऊस असेच वातावरण राज्यात सर्वत्र आहे.
असे आहेत पावसाचे यलो अलर्ट
कोकण : 22 ते 25 एप्रिल
मध्य महाराष्ट्र : 22 ते 24 एप्रिल
मराठवाडा : 22 ते 24 एप्रिल
विदर्भ : 22 ते 24 एप्रिल
रविवारचे कमाल तापमान
वाशिम 43.2, पुणे 38, अहमदनगर 39.8, जळगाव 41.4, कोल्हापूर 34, महाबळेश्वर 31.1, मालेगाव 41.6, नाशिक 37.7, सांगली 33.1, सोलापूर 39.6, छ. संभाजीनगर 40.2, परभणी 42.2, बीड 40.7, अकोला 43, अमरावती 41, चंद्रपूर 41.8, गोंदिया 40.7, नागपूर 40.2.
हेही वाचा
निवडणूक प्रचारगीतातून ‘हिंदू’, ‘जय भवानी’ शब्द वगळा; ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस
कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये पुन्हा मोबाईल; कैद्यावर गुन्हा
कोल्हापूर : माघारीचा आज शेवटचा दिवस