जलसमृद्ध नाशिक अभियानामुळे पाणी क्षमता वाढण्यास मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समृद्ध नाशिक फाउंडेशनच्यावतीने जलसमृद्ध नाशिक अभियान २०२४ मोहिमेच्या पाचव्या दिवसापर्यंत गंगापूर धरणातून आठ हजार ४४० क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. यामुळे तब्बल ८४ लाख पाच हजार लिटर पाणी क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. गंगावऱ्हे गावालगत गंगापूर धरणातून गेल्या सहा दिवसांपासून गाळ उपसा मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला शहरातील …

जलसमृद्ध नाशिक अभियानामुळे पाणी क्षमता वाढण्यास मदत

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
समृद्ध नाशिक फाउंडेशनच्यावतीने जलसमृद्ध नाशिक अभियान २०२४ मोहिमेच्या पाचव्या दिवसापर्यंत गंगापूर धरणातून आठ हजार ४४० क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. यामुळे तब्बल ८४ लाख पाच हजार लिटर पाणी क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
गंगावऱ्हे गावालगत गंगापूर धरणातून गेल्या सहा दिवसांपासून गाळ उपसा मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला शहरातील अनेक संस्था, संघटना आणि फाउंडेशनचे बळ मिळत असून, गेल्या सहा दिवसातच आठ हजारांपेक्षा अधिक क्युबिक मीटर गाळाचा उपासा करण्यात आला. याठिकाणी तीन पोकलेन मशीन सातत्याने सुरू असून, १५ पेक्षा अधिक हायवा ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने, गाळ शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत पोहोचविला जात आहे. मोहिमेच्या पाचव्या दिवशी तब्बल १४४ हायवा आणि ६ टॅक्टर गाळ शेतकऱ्यांनी वाहून नेला. या मोहिमेला भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थाकडून विशेष पाठबळ मिळत आहे. दरम्यान, भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेवून नाशिक जिल्ह्यातील गाळ काढण्याची मोहिम प्रशासनाबरोबरच नाशिकमधील नामांकित संस्थांनी हाती घेतल्याने, त्याचा पाण्याची साठवणूक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
मोहिमेचे पाच दिवस
पहिला दिवस : २३५० क्युबिक मीटर गाळाचा उपसा – २३ लाख ४० हजार लिटर पाणी क्षमता
दुसरा दिवस : १३०० क्युबिक मीटर गाळाचा उपसा – १२ लाख ७५ हजार लिटर पाणी क्षमता
तिसरा दिवस : १२५० क्युबिक मीटर गाळाचा उपसा – १२ लाख ५० हजार लिटर पाणी क्षमता
चौथा दिवस : १८०० क्युबिक मीटर गाळाचा उपसा – १८ लाख लीटर पाणी क्षमता
पाचवा दिवस : १७४० क्युबिक मीटर गाळाचा उपसा – १७ लाख ४० हजार लीटर पाणी क्षमता
हेही वाचा:

Lok Sabha Election 2024 | नाशिकबाबत आता भाजप-सेनेत धुसफुस : उमेदवार निवडीचा पेच कायम
उद्योगांना वीज दरवाढीचा ‘शॉक’
Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेसह पाऊसही; हवामान विभागाचा इशारा