निवडणूक रोखे, ईडीसह अनेक मुद्द्यांवर PM मोदींची भूमिका; पहा काय म्हणाले…
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : PM Narendra Modi : पीएम नरेंद्र मोदींची आज एनआय या वृत्तसंस्थेने मुलाखत घेतली. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींनी या मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर मत व्यक्त केले. निवडणूक रोखे, ईडी, इलेक्ट्रीक धोरण यासह वन नेशन वन इलेक्शन विषयांवर त्यांनी बोलताना भाजपची भूमिका मांडली.
या मुलाखतीमध्ये बोलताना पीएम मोदींनी काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय आणि कार्याविषयक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या ५ दशकांशी माझ्या १ दशकाची तुलना करा. मी केलेल्या कामांचा आढावा घ्या. काँग्रेस फक्त टीका करत आहे. त्यांनी केलेली आश्वासने कधीच पूर्ण झाली नसल्याचा आरोपही मोदींनी केला.
आम्ही जे बोलतो त्यावर जनतेचा विश्वास
विरोधक करत असलेल्या टिकांवर बोलताना म्हणाले की, विरोधकांची मत काय आहे याबाबत मला माहित नाही. पण आम्ही देशभरात चांगली कामे करत आहोत. आम्ही प्रत्येक गावागावात पोहोचलो आहोत. आम्ही जे बोलतो त्यावर जनतेचा विश्वास आहे.
राममंदिर हा विरोधकांचा फक्त चर्चेचा विषय
राममंदीर हे लोकवर्गणीतून तयार झालं आहे. पंतप्रधान म्हणून नाही तर मी रामभक्त म्हणून मरायला तयार आहे. राममंदिर हा विरोधकांचा चर्चेचा विषय आहे. आम्ही यासाठी काम केलं असल्याचे पीएम मोदी म्हणाले.
आम्ही नेहमी चांगल्या भूमिका ठेवल्या आहेत. कोरोनाविरोधात लढ्यात सर्वच राज्यात चांगलं काम केलेलं आहे. नेबर फर्स्ट हे आमचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. मी योग्य दिशेला जाण्याचा प्रयत्न केला आहे असेही पीएम मोदी म्हणाले. भीती असते, प्रामाणिकपणाला कसली भीती असा सवालही केला.
निवडणूक रोख्यांमुळे व्यवहार समजू शकले
निवडणूक रोख्यांबाबत बोलत असताना पीएम म्हणाले की, निवडणूक रोख्यांमुळे व्यवहार समजू शकले. निवडणूकांमध्ये खर्च हा होतच असतो. आणि तो सर्वच पक्षांचा होतो. काळ्या पैशापासून मुक्त करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे. कारवाई झालेल्या कंपन्यांपैकी ३७ टक्के कंपन्यांनी भाजपला पैसे दिले आहेत. रोख्यांच्या निर्णयात बदल होऊ शकतो असेही ते म्हणाले.
ईडीच्या कारवाईतील फक्त ३ टक्के लोक राजकीय पक्षांशी संबंधित
ईडीवर बोलत असताना म्हणाले की, ईडीने जेवढी कारवाई केल्या आहेत त्यामध्ये ३ टक्के लोक हे राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. बाकीचे जवळपास ९७ टक्के लोक असे आहेत की ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. गेल्या १० वर्षात २२०० कोटी कॅश जप्त करण्यात आली आहे. याचाच अर्थ ईडी चांगलेच काम करत आहे हे स्पष्ट आहे.
इलेक्टीक धोरण हा तरुणांना रोजगार मिळवू देणारा
इलेक्टीक धोरणावर बोलताना पीएम म्हणाले की, भारतात सर्वाधिक कंपन्या याव्यात हे आमचं धोरण आहे. अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करतील याचा आम्ही विचार करत आहोत. यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. नवनवीन तांत्रिक प्रगती होईल.
भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास
भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास केल्याचेही पीएम मोदी म्हणाले. भारताला तुकड्यात बघणं हे चुकीचं आहे. असं करणं हे अज्ञानाचे लक्षण आहे.
निवडणूकीला उत्सवाचं स्वरुप दिल्याने लोकशाहीचं महत्त्व समजेल
निवडणूकीत मतदार महत्त्वाचा असतो. निवडणूकीला उत्सवाचं स्वरुप दिल्याने लोकशाहीचं महत्त्व समजू शकेल. २०४७ ला भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे लोकशाहीसाठी हे महत्त्वाचं आहे. देश अजून प्रगती करणार असल्याचेही मोदी म्हणाले.
वन नेशन वन इलेक्शनचा देशाला फायदा
वन नेशन वन इलेक्शन वर बोलताना म्हणाले की, या पद्धतीचा देशाला फायदा होणार आहे. देशभरात एकाच वेळी निवडणूक होत असतील तर याचे अनेक चांगल्या बाबी पहायला मिळतील. आम्ही यासाठी काम करणार आहोत.
Latest Marathi News निवडणूक रोखे, ईडीसह अनेक मुद्द्यांवर PM मोदींची भूमिका; पहा काय म्हणाले… Brought to You By : Bharat Live News Media.