झाडावरून पडल्याने ४० वर्षीय महिलेचा मृत्यू
नाशिक : झाडावरून पडल्याने ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक तालुक्यातील दूगाव येथे घडली. जनावरांसाठी पाला तोडण्यासाठी झाडावर चढली होती, मात्र तोल गेल्याने खाली पडून तिचा मृत्यू झाला. याबाबत नाशिक तालूका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निर्मला सिताराम गायकवाड असे महिलेचे नाव आहे. निर्मला या सोमवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास घराजवळील सुबाभळीच्या झाडावर चढल्या होत्या. शेळ्या- मेंढ्यासाठी पाला तोडताना तोल गेल्याने त्या झाडावरून पडल्या. खाली पडल्याने निर्मला यांच्या छातीस, पोटास दुखापत झाल्याने त्यांना गिरणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा –
‘गुजरातचा विकास, निवडणूक रोखे, राममंदिर, ईडी हे देशासाठी…’ : पहा काय म्हणाले पीएम मोदी
प्रियकराचा मृतदेह घेऊन ‘ती’चा ४८ तास प्रवास, पण अखेर हत्येचे बिंग फुटले
Latest Marathi News झाडावरून पडल्याने ४० वर्षीय महिलेचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.