काँग्रेस जनतेला ताजमहालही बांधून देईल: देवेंद्र फडणवीस
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: भाजपचे संकल्पपत्र लोकांनी स्वीकारले आहे. कारण यात मोदींची गॅरंटी आहे. काँग्रेसचा जाहीरनामा अपयशी ठरला असून काँग्रेसकडे विकासाची दृष्टी, जनहिताची कुठलीही गोष्ट नसल्याने व त्यांची विश्वासार्हता जनतेत संपल्याने केवळ संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात येणार, अशी त्यांची जुमलेबाजी सुरू आहे. उद्या ते जनतेला ताजमहालही बांधून देऊ असे सांगतील, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१५) पत्रकार परिषदेत विरोधकांना लगावला. Devendra Fadnavis on Congress
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ मोहन मते,प्रवीण दटके, कृष्णा खोपडे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, संविधान हा ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असून पूर्ण बहुमत असताना देखील ते बदलण्याचा विचार त्यांनी केला नाही. अग्नीवीर योजना रद्द करण्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या जाहीरनामात दिलेले आश्वासन याकडे लक्ष वेधले असता यात देशाचेच नुकसान होईल. भारतीय सैन्यामध्ये युवकांचा अधिकाधिक सहभाग असावा, अशी मागणी सैन्यातूनच होत आहे ओबीसी संदर्भात बोलण्याचा काँग्रेसला अधिकारच नाही. काँग्रेसने ओबीसी समाजाचा केवळ वापर केला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. या देशाच्या रक्तातच लोकशाही आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर घाला घातला पण त्यांना देखील लोकशाही संपवता आलेली नाही. Devendra Fadnavis on Congress
2019 मध्ये मोदी सरकारने निवडणूकपूर्व जाहीरनाम्यात दिलेली अयोध्येत राम मंदिरासह 75 टक्के आश्वासने पूर्ण झाली आहेत. भाजपचे संकल्प पत्र हे कागदी जाहीरनामा नव्हे तर मोदीजींची गॅरंटी असून सर्व घटकांचा सर्वांगीण विकासाचा संकल्प व संधी यात आहे.
देशात समान नागरी कायदा हवा यावर भर दिला असून वेळ व पैसा बचतीसाठी वन नेशन वन इलेक्शन देशाच्या हिताचे आहे. या पुढील काळात याबाबतीत नक्कीच पूर्तता केली जाईल, याचा फायदा महिलांना सर्वाधिक अधिकार मिळण्याच्या दृष्टीने होईल, यावर फडणवीस यांनी भर दिला. 2 कोटी रोजगाराच्या आश्वासनापेक्षा अधिक संधी स्टार्टअप आणि इतर एमएसएमई अशा विविध माध्यमातून उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा
Lok Sabha Election: काँग्रेस हा लबाड लोकांचा पक्ष: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावतीची जागा भाजपचीच, उमेदवार आमच्याच चिन्हावर लढणार; देवेंद्र फडणवीस यांची भूमिका स्पष्ट
हर्षवर्धन पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांचे बोलावणे; इंदापूरमध्ये राजकीय चर्चांना उधाण
Latest Marathi News काँग्रेस जनतेला ताजमहालही बांधून देईल: देवेंद्र फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.