जळगावात अंगावर वीज कोसळल्याने तरुण जागीच ठार

जळगाव- गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. आज दि. 12 रोजी दुपारी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह वादळी पाऊस झाला. यात एरंडोल तालुक्यातील नागदेवी येथे वीज कोसळल्याने ३५ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. एरंडोल तालुक्यातील नागदुली श्रीकांत उर्फ भैया भिका पाटील ( वय ३५ ) हा तरुण आपल्या परिवारासह राहतो. शेतीचे काम … The post जळगावात अंगावर वीज कोसळल्याने तरुण जागीच ठार appeared first on पुढारी.

जळगावात अंगावर वीज कोसळल्याने तरुण जागीच ठार

जळगाव- गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. आज दि. 12 रोजी दुपारी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह वादळी पाऊस झाला. यात एरंडोल तालुक्यातील नागदेवी येथे वीज कोसळल्याने ३५ वर्षीय तरुण जागीच ठार झाला.
एरंडोल तालुक्यातील नागदुली श्रीकांत उर्फ भैया भिका पाटील ( वय ३५ ) हा तरुण आपल्या परिवारासह राहतो. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.  दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यावेळी श्रीकांत हा वडील भिका लक्ष्मण पाटील आणि काही मजुरांसोबत शेतातील चारा कुट्टी जमा करत होते. त्यावेळी श्रीकांत पाटील हा तरुण लाकूड घेण्यासाठी बाजूला जात असताना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने मयत तरुणाचे वडील थोडक्यात बचावले आहे.
ही घटना वडील भिका पाटील यांच्यासमोर झाली. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केला आणि मुलास शेजार्‍यांच्या मदतीने वाहनात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. एकुलता एक मुलगा वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मयताच्या पश्चात आर्ई, वडील, मुलगा, दोन मुली तसेच पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
हेही वाचा –

कोल्हापूर : दूधगंगा नदीचे पात्र चौथ्यांदा कोरडे! दत्तवाड परिसरात पाणीप्रश्न गंभीर
नाशिकच्या सिडकोत टिपू सुलतानचा बॅनर झळकल्याने खळबळ, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

Latest Marathi News जळगावात अंगावर वीज कोसळल्याने तरुण जागीच ठार Brought to You By : Bharat Live News Media.