सोलापूर : दौंड-सोलापूर पॅसेंजरचा अपघात; मॉकड्रिलनंतर सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : दौंड-सोलापूर ( ११४२१) ही पॅसेंजर रेल्वे गाडी दौंड स्थानकावरून सुटली आणि लगेचच पुढे अपघात झाला. डब्यावर डबे चढले. प्रवाशांची आरडाओरड, रक्ताने माखलेले प्रवासी, वाचवा वाचवाच्या किंकाळ्या… यामुळे एक तास रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. नेमकी घटना कशी व कोठे घडली. याबाबत जो तो … The post सोलापूर : दौंड-सोलापूर पॅसेंजरचा अपघात; मॉकड्रिलनंतर सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास appeared first on पुढारी.

सोलापूर : दौंड-सोलापूर पॅसेंजरचा अपघात; मॉकड्रिलनंतर सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

सोलापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : दौंड-सोलापूर ( ११४२१) ही पॅसेंजर रेल्वे गाडी दौंड स्थानकावरून सुटली आणि लगेचच पुढे अपघात झाला. डब्यावर डबे चढले. प्रवाशांची आरडाओरड, रक्ताने माखलेले प्रवासी, वाचवा वाचवाच्या किंकाळ्या… यामुळे एक तास रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. नेमकी घटना कशी व कोठे घडली. याबाबत जो तो विचारणा करीत असताना काही वेळातच समजले की, मॉकड्रिल होते. अपघातानंतर रेल्वेची यंत्रणा किती अलर्ट असते, हे पाहण्यासाठी हे मॉकड्रिल केले. हे स्पष्ट झाल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. Solapur Nerws

दरवर्षी मोठ्या अपघाताच्या वेळी सतर्कता आणि प्रतिसादाची वेळ तपासण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल संयुक्त कवायत करते. याबाबत शुक्रवारी (दि.१२) दौंड रेल्वे स्थानक येथे संयुक्त मॉकड्रिल घेण्यात आले. कृत्रिम अपघाताची परिस्थिती तयार केली गेली. अपघातग्रस्त डब्यांमध्ये सुमारे ५० प्रवासी जखमी झाल्याचे दर्शविण्यात आले. सकाळी १०.४५ वाजता मॉकड्रिल सुरू करण्यात आले. थेट दुपारी १ वाजेपर्यंत ते चालले. Solapur Nerws

दरम्यान, नियंत्रण कक्षातील क्षेत्रीय कर्मचाऱ्याकडून संदेश देण्यात आला. लगेचच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ), रुग्णवाहिका, अग्निशमन दल दाखल झाले. आरपीएफने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. रेल्वे दवाखान्यातील डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. जखमींची तपासणी करण्यात आली. संपूर्ण परिस्थिती एक तासाच्या आत नियंत्रणात आली. या घटनेवर सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांची पूर्ण नजर होती.
यावेळी सोलापूरचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार, पुण्याचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंह, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी शिवाजी कदम, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता गजेंद्र सिंह मीना, सहाय्यक विभागीय संरक्षा अधिकारी भगत, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक सुदर्शन देशपांडे, डॉ. विनोद, डॉ. निरंजन, डॉ. आर श्रीनिवास आणि सहाय्यक परिचालन व्यवस्थापक (जनरल) सोलापूर एम. पी. सिंग, टीम कमांडर इन्स्पेक्टर आर. जे. यादव, धर्मेंद्र सेवडा, नागरी संरक्षण जगदीश सिदगणे, सहायक यांत्रिक अभियंता सिद्धार्थ सिंग, रणजीत चाबडा आधी उपस्थित होते. चीप मेडिकल सुप्रीडेंट संजीव एन. के. यांनी कृत्रिम श्वासोश्वास व प्रथमोपचार याबद्दल माहिती व प्रात्यक्षिक सादर केले. या मॉक ड्रिलमध्ये जवळपास १०० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
Solapur Nerws : बघ्यांचीही झाली गर्दी
स्थानकातील कर्मचाऱ्यांने सायरन वाजविले. ध्वनिक्षेपकावर एक अधिकारी तत्काळ मदत मिळावी, यासाठी वारंवार सूचना करताना दिसून आला. या घटनेची माहिती शहरांमध्ये हवेसारखी माहिती पसरली होती. यामुळे दौंड रेल्वे स्थानकावर बघ्यांचीही गर्दी झाली होती.
हेही वाचा 

Solapur Railway : रेल्वेचे डबे, इंजिन, चाके भंगारात: सोलापूर विभागाने कमावले ४२.६४ कोटी
सोलापूर: बंगळूरू-कलबुर्गी-बंगळूरसाठी रेल्वेच्या अतिरिक्त २० फेऱ्या
सोलापूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सौर उर्जेवर चालणाऱ्या ई-सायकलची निर्मिती

Latest Marathi News सोलापूर : दौंड-सोलापूर पॅसेंजरचा अपघात; मॉकड्रिलनंतर सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास Brought to You By : Bharat Live News Media.