हिंगोली: वारंगा बाळापूर, डोंगरकडा परिसरात अवकाळीने पिकांचे नुकसान

आखाडा बाळापूर:  पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, वारंगा फाटा परिसरामध्ये आज (दि. ९) सायंकाळी ५.३० वाजता अवकाळी पावसाने हजेरी  लावली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. मेघ गर्जनेसह जोरदार पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. मागील दोन दिवसांपासून वातावरणामध्ये रात्रीच्या वेळी उष्मा जाणवत होता. अवकाळी पावसामुळे शिजवलेल्या आणि … The post हिंगोली: वारंगा बाळापूर, डोंगरकडा परिसरात अवकाळीने पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

हिंगोली: वारंगा बाळापूर, डोंगरकडा परिसरात अवकाळीने पिकांचे नुकसान

आखाडा बाळापूर:  Bharat Live News Media वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, वारंगा फाटा परिसरामध्ये आज (दि. ९) सायंकाळी ५.३० वाजता अवकाळी पावसाने हजेरी  लावली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. मेघ गर्जनेसह जोरदार पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला.
मागील दोन दिवसांपासून वातावरणामध्ये रात्रीच्या वेळी उष्मा जाणवत होता. अवकाळी पावसामुळे शिजवलेल्या आणि वाळवलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर  बागातील केळीचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर रब्बीच्या काढणीस आलेल्या ज्वारीच्या पिकाचेही नुकसान झाले.  सुसाट वाऱ्यामुळे आंबा, लिंबू, इतरही फळबागांचेही नुकसान झाले. डोंगरकडा, वारंगा, जवळा, डिग्रस बु, सुकळी वीर  भागातील पिकांचे नुकसान झाले. अवकाळी वाऱ्यामुळे व पावसामुळे रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा बंद झाला होता.
हेही वाचा 

हिंगोली: सेनगाव येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी खरेदी- विक्री व्यवहार बंद पाडला
Hingoli Lok Sabha : हिंगोली लोकसभेसाठी ३३ उमेदवार रिंगणात; १५ अपक्षांची माघार, चौरंगी लढत

Latest Marathi News हिंगोली: वारंगा बाळापूर, डोंगरकडा परिसरात अवकाळीने पिकांचे नुकसान Brought to You By : Bharat Live News Media.