अखेर मनसे महायुतीत; राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभेत मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Raj Thackeray Speech : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईच्या शिवाजी पार्कवर सभा पार पडली. या सभेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत सोबत जातील अशा चर्चा होत्या. आज राज ठाकरेंनी याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अखेर मनसे महायुतीत सामील होणार आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी … The post अखेर मनसे महायुतीत; राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभेत मोठी घोषणा appeared first on पुढारी.

अखेर मनसे महायुतीत; राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभेत मोठी घोषणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Raj Thackeray Speech : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईच्या शिवाजी पार्कवर सभा पार पडली. या सभेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत सोबत जातील अशा चर्चा होत्या. आज राज ठाकरेंनी याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अखेर मनसे महायुतीत सामील होणार आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील सभेत केली आहे. गुढीपाडवा मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
आज जगात सर्वाधिक तरुण देश भारत आहे. या तरुणांना उद्योगांची गरज आहे, रोजगाराची आहेत सोई सुविधांची गरज आहे. माझी नरेंद्र मोदींकडून एकच अपेक्षा आहे की भारतातील तरुणांकडे लक्ष द्या. हेच भारताचं भविष्य आहे. प्रत्येक देशाचा एक काळ येत असतो. या देशाला एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. जर देशाच्या विकासासाठीच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेंची तोफ धडाडणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे महायुती हा सगळा करेल हा विचार करतो आणि महायुतीला बिनशर्त पाठींबा देत असल्याची घोषणा करत आहे. तसेच कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याची घोषणा देखील केली आहे.
सध्या निवडणुकांचा काळ आहे. २०१९ नंतर निवडणूका होत आहेत. अमित शहांच्या भेटीनंतर अनेक चर्चा सुरु झाल्या. मी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशा चर्चा सर्वात जास्त रंगल्या होत्या. या चर्चा का केल्या जात होत्या मला माहित नाही. पण मी एकच सांगतो की, मी फक्त बाळासाहेब ठाकरेंचा शिलेदार आहे. माझा स्वत:चा पक्ष आहे. मी त्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. मला माझं चिन्ह सर्वात जास्त प्रिय आहे. त्यावर मी ठाम आहे असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
माझा काँग्रेसशी जास्त काही संबंध आला नाही. भेट होत असायच्या मात्र भाजप सोबत गाठी पडल्या. अनेक नेत्यांना भेटलो. मी गुजरातला गेल्यानंतर पीएम नरेंद्र मोदींना भेटलो. त्यावेळी गुजरातहून आल्यानंतर मला काहींनी प्रश्न विचारला होता की गुजरात कसा आहे. तर मी एकच उत्तर दिले होते की, गुजरातमध्ये विकास आहे मात्र महाराष्ट्र खूप पुढे आहे. मोदींनी पंतप्रधान करावं यासाठी पहिलं मत मांडणारा राज ठाकरे एकमेव नेता महाराष्ट्रातून होता. असं ठाकरे यावेळी म्हणाले. माझं महाराष्ट्रावर सर्वात जास्त प्रेम आहे. आणि महाराष्ट्राच्या विरोधात बोलणारे मला खपणार नाही असंही ठाकरे म्हणाले.
मला वाटलं होतं की भाजपचं सरकार आल्यानंतर खूप काही बदल होईल. मात्र सध्या काय काय सुरु आहे हे चित्र सगळ्यांच्या समोर आहे. पण जे चुकीचं आहे त्याला मी विरोध करतो. गेल्या पाच वर्षात खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. ज्या गोष्टी मला पटल्या त्यासाठी मी काम केलं आहे.
आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करत आहेत त्यापद्धतीने मी कधीच टीका केलेल्या नाहीत. सत्तेसाठी कधीच बोलत नाही. मुख्यमंत्री व्हायचय म्हणून काहीपण करणारा मी नाही असे स्पष्ट मत ठाकरेंनी व्यक्त केले.

Latest Marathi News अखेर मनसे महायुतीत; राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभेत मोठी घोषणा Brought to You By : Bharat Live News Media.