अति तिथं माती! मौजमजा करण्याच्या क्षणिक मोहात अडकला अन्…

सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडीची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. अति हाव माणसाला कशी मातीत घालते, हा या गोष्टीचा मथितार्थ! एका तरुणाचं आहे त्या नोकरीत बरं चाललं होतं; पण त्याला त्यापेक्षा भलं अपेक्षित होतं आणि ते साध्य करण्यासाठी त्याने सोन्याचं अंडे देणारी कोंबडी कापली आणि सगळंच मुसळ केरात गेलं आणि हा कारागृहात… (Thane Crime Diary) संबंधित बातम्या  … The post अति तिथं माती! मौजमजा करण्याच्या क्षणिक मोहात अडकला अन्… appeared first on पुढारी.

अति तिथं माती! मौजमजा करण्याच्या क्षणिक मोहात अडकला अन्…

नरेंद्र राठोड, ठाणे

सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडीची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. अति हाव माणसाला कशी मातीत घालते, हा या गोष्टीचा मथितार्थ! एका तरुणाचं आहे त्या नोकरीत बरं चाललं होतं; पण त्याला त्यापेक्षा भलं अपेक्षित होतं आणि ते साध्य करण्यासाठी त्याने सोन्याचं अंडे देणारी कोंबडी कापली आणि सगळंच मुसळ केरात गेलं आणि हा कारागृहात… (Thane Crime Diary)
संबंधित बातम्या 

Pudhari Crime Diary : ज्या साडीत पांडबाचा जीव अडकला, तिच साडी त्याच्या गळ्याभोवतीचा फास बनून गेली
Pudhari Crime Diary : गुन्हेगारांची मानसिकता!, गुन्ह्यांची मालिका!
पणजी : ५.६ कोटींच्या लॉटरीचे आमिष दाखवून महिलेला घातला २५ लाखांचा गंडा

ठाण्यातील रेल्वे स्थानकासमोरच असलेल्या चांगल्या सोसायटीत राहणारा राहुल जयंतीलाल मेहता हा पस्तिशीतला सेल्समन. नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डॉ. मुस रोडवरील एका मोठ्या ज्वेलर्स दुकानात उत्तम पगाराची नोकरी तो करायचा. त्याचे काम उत्तम व प्रामाणिक असल्याने दुकान मालकाचा अल्प काळातच त्याच्यावर बर्‍यापैकी विश्वास बसला होता. तो फक्त दुकानात राहूनच नव्हे, तर बाहेरच्या व्यापार्‍यांकडे देखील दागिन्यांची खरेदी-विक्री करू लागला होता. मालक विश्वासाने त्याच्या हातात करोडोचे दागिने देऊ लागले होते.
एकीकडे चांगली नोकरी व दुसरीकडे सुखी परिवार, असे आनंदी जीवन असताना देखील राहुल मीरा रोड येथे राहणार्‍या एका तरुणीच्या प्रेमात पडला. या तरुणी सोबतची मैत्री त्याला आवडू लागली. हळूहळू तो मैत्रिणीला सोबत घेऊन मौजमजा करू लागला. साहजिक या मौजमजेवर त्याचा अमाप पैसा खर्च होऊ लागला व पगाराचे पैसे कमी पडू लागले. पैशाची कमतरता भासत असल्याने तो पैसे मिळवण्यासाठी धडपड करू लागला.
अन् येथूनच त्याचे पाऊल वाईट मार्गावर पडले. त्याने सेल्समनचे काम करीत असलेल्या ज्वेलर्स दुकानात चोरी करायचे ठरवले. संधी मिळेल तसे तो दुकानातून व त्यास विक्री करण्यास दिलेल्या दागिन्यांतून छोटी-मोठी चोरी करू लागला. एक-दोन वेळा चोरी करून देखील चोरीचा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही, हे बघून तर त्याचे मनोबल आणखी वाढले.
ज्वेलर्स दुकानातून मोठी चोरी करायची व परराज्यात जाऊन मैत्रिणीसोबत स्थायिक व्हायचे, असे स्वप्न आता राहुल रंगवू लागला होता. त्याच्या या स्वप्नांना त्याच्या मैत्रिणीने अधिकच हवा दिली. त्याने मोठी चोरी करण्याच्या योजनेवर काम सुरू केले व संधीची वाट बघू लागला. अखेर 9 मार्च रोजी त्यास ही संधी मिळाली. राहुल सेल्समन असलेल्या ज्वेलर्स दुकान मालकाने त्यास 38 सोन्याचे हार, 24 जोडी कर्णफुले, 5 चैन, बाजुबंद असे 1 कोटी 5 लाख रुपये किमतीचे दागिने विक्री करण्यासाठी दिले होते. हे दागिने विक्री करून त्याचे पैसे दुकानात त्यास जमा करायचे होते.
मात्र, राहुल दागिने विक्री करण्यास गेला तो परत न येण्यासाठी. मालकाचा त्याच्यावर विश्वास असल्याने राहुल एक-दोन दिवसांत परत येईल, असा मालकाने समज करून त्याची वाट बघितली. मात्र, दहा दिवस उलटून देखील तो परतला नाही. या काळात त्याने आपला फोन देखील बंद ठेवला होता. अखेर दुकान मालकाने 25 मार्च 2024 रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात दागिने चोरीची फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता, तो 8 मार्चपासून घरी परतला नसल्याचे समोर आले. त्याच्या पत्नीने नौपाडा पोलिसांत 15 मार्च रोजी त्याच्या मिसिंगची तक्रार दाखल केल्याचे देखील समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता तो मीरा रोड, मुंबई, इंदौर, गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचे आढळून आले. त्याला आता आपले स्वप्न पूर्ण झाले, असे वाटू लागले होते. याच दरम्यान त्याने आपल्या मैत्रिणीशी मोबाईलवरून संपर्क साधला अन् तिला भेटण्यासाठी मीरा रोड येथे येणार माहिती फोनवरून दिली. त्याला वाटत होते की सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे होत आहे. पण, आपण आखलेला प्लॅन निव्वळ बेवकुफी असून, आपल्या प्रत्येक हालचालीवर पोलिस नजर ठेवून आहेत, याची त्याला साधी कल्पना देखील आली नसावी.
26 मार्च रोजी तो त्याच्या मैत्रिणीला भेटण्यास मीरा रोड येथे आला. त्याच वेळी त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यास सापळा रचून मीरा रोड परिसरातून अटक केली. त्याच्या ताब्यातून अपहार केलेल्या दागिन्यांपैकी 62 लाख 10 हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले. इतर दागिने मौजमजा करण्यासाठी विक्री केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. एक चांगला सेल्समन मौजमजा करण्याच्या क्षणिक मोहात अडकला अन् थेट गजाआड जाऊन पोहोचला. (Thane Crime Diary)
The post अति तिथं माती! मौजमजा करण्याच्या क्षणिक मोहात अडकला अन्… appeared first on Bharat Live News Media.