कोल्हापूर : रंकाळा तलावाजवळ तरुणाचा पाठलाग करून निर्घृण खून; हल्लेखोर पसार

कोल्हापूर : रंकाळा तलावाजवळ तरुणाचा पाठलाग करून निर्घृण खून; हल्लेखोर पसार

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापुरात आज (दि. ४) सायंकाळी तरुणाचा पाठलाग करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली. रंकाळा परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजय दगडू शिंदे असे या मृत तरुणाचे नाव आहे. रंकाळा तलावाजवळ पाच तरुणांनी पाठलाग करत तलवारी, कोयत्यासह तरुणाचा हा खून केल्याची प्राथमिक माहिती माहती आहे. हल्लेखोर खून करुन पसार झाले असल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
हेही वाचा

खळबळजनक! कोल्हापूर शहरातील ओढ्यात आढळला शीर नसलेला मृतदेह

Latest Marathi News कोल्हापूर : रंकाळा तलावाजवळ तरुणाचा पाठलाग करून निर्घृण खून; हल्लेखोर पसार Brought to You By : Bharat Live News Media.