कोल्हापूर : संभाजीराजे – संजय मंडलिक भेटीने चर्चांना उधाण  

कोल्हापूर : संभाजीराजे – संजय मंडलिक भेटीने चर्चांना उधाण  

सरवडे: Bharat Live News Media वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती व आणि महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आज (दि.४) एकत्र आले. यावेळी हास्य व हस्तांदोलनाने भेट होताच सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. दोन दिग्गजांनी निवडणूक विषयांवर कोणतेही भाष्य न करता अगदी हसतखेळत औपचारिक गप्पा मारल्या. परंतु, या भेटीची जिल्हाभर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. Sambhaji Raje – Sanjay Mandlik
संभाजीराजे व खासदार मंडलिक हे सुनियोजित कार्यक्रमामुळे राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील गोकुळचे संचालक व बिद्रीचे माजी उपाध्यक्ष लोकनेते स्व. विजयसिंह कृष्णाजी मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणास अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांसह आले होते. Sambhaji Raje – Sanjay Mandlik
दरम्यान, हे दोघे अचानक एकमेकांसमोर आले. दोघांनी हस्तांदोलन केले. आणि हस्य करत चर्चा केली. दोघांच्या भेटीत काय चर्चा होते, या उत्सुकतेने कार्यकर्ते व उपस्थितीतांनी त्याचभोवती गर्दी केली. परंतु, त्यांनी मैत्री, घरगुती व स्व. विजयसिंह मोरे यांचे कार्य यावरच गप्पा मारल्या. छत्रपती संभाजीराजे यांनी संजय मंडलिक यांनी कपाळावर लावलेला भंडारा पाहून खुणेद्वारे खुणवताच सर्वच हास्यकल्लोळात दंग झाले. त्यानंतर छायाचित्रकारांना पोझ देत उपस्थितांना नमस्कार करत दोघेही  मार्गस्थ झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.
हेही वाचा 

कोल्हापूर : रंकाळा तलावाजवळ तरुणाचा पाठलाग करून निर्घृण खून; हल्लेखोर पसार
खळबळजनक! कोल्हापूर शहरातील ओढ्यात आढळला शीर नसलेला मृतदेह
कोल्हापूर : करवीरमध्ये गटांचे वर्चस्व; पण ताकद महाविकास आघाडीकडे

Latest Marathi News कोल्हापूर : संभाजीराजे – संजय मंडलिक भेटीने चर्चांना उधाण   Brought to You By : Bharat Live News Media.