पिंपळनेर परिसरातील खाजगी बाजार समितीच्या सेवा शुल्काला शेतकऱ्यांचा विरोध
पिंपळनेर: (जि.धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा परिसरात खाजगी कृषी मार्केट सुरू झाल्याने या ठिकाणी कांदा लिलाव सुरू करण्यात आला आहे. मात्र , सेवा शुल्काच्या नावाखाली नऊ ते दहा रुपये प्रतिक्विंटल असा दर शेतकऱ्यांकडून आकारला जात असल्याने यासंदर्भात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भदाने यांच्या नेतृत्वात अपर तहसीलदार संजय भदाने यांची भेट घेऊन खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवाशुल्क बंद करण्याबाबत निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळनेर व दहिवेल येथे खाजगी मार्केट सुरू झाल्याने मागील वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कांदा व इतर शेतीमालाची खरेदी विक्री होत आहे. मात्र,शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीवर प्रतिक्विंटल 9 ते 10 रुपयांची आकारणी करून सेवा शुल्क किंवा इतर कपात या नावाखाली शेतकऱ्यांच्या हिशोब बिलात कपात करण्यात येत आहे. ही कपात बेकायदेशीर असल्याने सेवा शुल्क किंवा इतर कपात प्रतिक्विंटल 9 ते 10 रुपये प्रतिवाहन आकारणी करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लयलूट करण्यात येत आहे.
साक्री तालुक्यातील सर्व खाजगी बाजार समित्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व मागील वर्षांपासून सुरु असलेली कपातीची रक्कम विक्री करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी यांना परत करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत तहसीलदार काय भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष संजय भदाने, उपाध्यक्ष गंगाधर माळी, तालुकाध्यक्ष अनिल भामरे, उपाध्यक्ष संजय बच्छाव, तुषार गवळी, किशोर गांगुर्डे, सुरेश पवार, भरत गांगुर्डे, दिनेश केसरोद, संजय जगताप, खुशाल वाडेकर, सागर चौधरी, छोटू माळी, भूषण भदाने, सचिन खैरनार, अनिल पाटील, अजय सूर्यवंशी, शशिकांत पाटील उपस्थित होते.
हेही वाचा –
यूपीमधील भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे पडणार महागात!
Latest Marathi News पिंपळनेर परिसरातील खाजगी बाजार समितीच्या सेवा शुल्काला शेतकऱ्यांचा विरोध Brought to You By : Bharat Live News Media.