‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये द ग्रेट खलीची हजेरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शोच्या आणखी एका धमाल भागात प्रसिद्ध रेसलर द ग्रेट खलीचे स्वागत करण्यात येणार आहे. ‘मॅडनेस की मालकीन’ हुमा कुरेशीच्या उपस्थितीत या शोमधील कसलेले विनोदवीर आपल्या अतरंगी विनोदाने प्रेक्षकांना भरपूर हसवतील. होस्ट हर्ष गुजरालच्या स्टँड अप अॅक्टमध्ये ‘माता’ हा सगळ्यांचा … The post ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये द ग्रेट खलीची हजेरी appeared first on पुढारी.

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये द ग्रेट खलीची हजेरी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शोच्या आणखी एका धमाल भागात प्रसिद्ध रेसलर द ग्रेट खलीचे स्वागत करण्यात येणार आहे. ‘मॅडनेस की मालकीन’ हुमा कुरेशीच्या उपस्थितीत या शोमधील कसलेले विनोदवीर आपल्या अतरंगी विनोदाने प्रेक्षकांना भरपूर हसवतील.
होस्ट हर्ष गुजरालच्या स्टँड अप अॅक्टमध्ये ‘माता’ हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असेल. विनोदी अंगाने सादर केलेल्या या विषयात आईच्या प्रेमातला अतिरेक, सतत टोकण्याची सवय वगैरे हमखास दिसणाऱ्या गोष्टींवर रोख असेल
‘मोटिव्हेशनल एअरलाईन्स’ नावाच्या गॅगमध्ये परितोष त्रिपाठी आणि हेमांगी कवी एअरलाइनच्या क्रूच्या रूपात आणि केतन सिंह एका उत्साही मोटिव्हेशनल स्पीकरच्या रूपात प्रेक्षकांना एक हास्य-सफर घडवून आणतील. यात मोटिव्हेशनल स्पीकर्स आणि एअरलाईनमधल्या प्रवासाचे व्यंगात्मक रूप दाखवले जाईल. ‘ऑनेस्ट इंटरव्ह्यु’ या अॅक्टमध्ये कुशल बद्रिके आणि केतन सिंह अनुक्रमे उमेदवार आणि मुलाखतकार यांच्या भूमिकांमध्ये दिसतील. अगदी सामान्य, क्षुल्लक प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या इंटरव्ह्यूमधील पोकळपणा दाखवण्यात येईल.
Latest Marathi News ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये द ग्रेट खलीची हजेरी Brought to You By : Bharat Live News Media.