शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तरी बीड लोकसभा लढणार : ज्योती मेटे

शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तरी बीड लोकसभा लढणार : ज्योती मेटे

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा :  शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी बीडमधून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सोबतची बोलणी सकारात्मकपणे सुरू आहेत. मात्र, शरद पवारांनी तिकीट दिले नाही, तरी शिवसंग्राम बीड लोकसभा लढवेल, असे त्यांनी बुधवारी जाहीर केले.
ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी तीनवेळा चर्चा केली. बुधवारीदेखील त्यांची पुन्हा चर्चा झाली. मात्र, चर्चेच्या तीन फेर्‍या झाल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) निर्णय घेत नसल्याने शिवसंग्राममध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे निर्णयाला होत असलेला विलंब पाहता ज्योती मेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत बीडमधून काही झाले तरी आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले.
माझ्या उमेदवारीने बीडमध्ये मराठा, वंजारी असे कोणतेही मतांचे ध्रुवीकरण होणार नाही. दिवंगत विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी आयुष्यभर काम केले, तसे त्यांनी विविध घटकांसाठीही काम केले आहे. मराठा आरक्षणाप्रमाणेच ते मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचेही समर्थक होते. मात्र, बीडमधून मराठा समाजाबरोबरच अन्य घटकांचाही आपल्याला उत्स्फूर्त पाठिंबा असून, या जनमताच्या रेट्यामुळेच आपण निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, असे ज्योती मेटे यांनी सांगितले.
Latest Marathi News शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तरी बीड लोकसभा लढणार : ज्योती मेटे Brought to You By : Bharat Live News Media.