खळबळजनक! कोल्हापूर शहरातील ओढ्यात आढळला शीर नसलेला मृतदेह

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात गुरुवारी (दि.४) सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या पिछाडीस असलेल्या ओढ्यात शीर नसलेला सडलेला मृतदेह आढळून आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नालेसफाईचे काम सुरू आहे. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या ओढ्यामध्ये गुरूवारी सकाळी … The post खळबळजनक! कोल्हापूर शहरातील ओढ्यात आढळला शीर नसलेला मृतदेह appeared first on पुढारी.

खळबळजनक! कोल्हापूर शहरातील ओढ्यात आढळला शीर नसलेला मृतदेह

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात गुरुवारी (दि.४) सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या पिछाडीस असलेल्या ओढ्यात शीर नसलेला सडलेला मृतदेह आढळून आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नालेसफाईचे काम सुरू आहे. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या ओढ्यामध्ये गुरूवारी सकाळी महापालिकेच्या वतीने जेसीबीच्या साह्याने नालेसफाईचे काम कर्मचारी करत होते. यावेळी कर्मचाऱ्यांना नाल्यात पुरुषाचा सडलेला मृत्यू दिसून आला. यानंतर त्यांनी तात्काळ राजारामपुरी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचे शीर नसल्याने त्याचा शोध सुरू केला. दुपारपर्यंत हे शिर सापडले नव्हते. यावेळी परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, मृतदेह सापडल्यानंतर अपघात की घातपात याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : 

दानोळीत दाम्पत्याच्या गळ्यावर कोयता ठेवून लाखाचे दागिने लुटले
सीपीआर ड्रेसिंग मटेरियल खरेदीत घोळ
कोल्हापूर : कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण 15 दिवसांत करा

Latest Marathi News खळबळजनक! कोल्हापूर शहरातील ओढ्यात आढळला शीर नसलेला मृतदेह Brought to You By : Bharat Live News Media.