पुणे : 268 दवाखान्यांचे परवाना नूतनीकरण; आरोग्य विभागाकडून प्रक्रिया सुरू

पुणे : 268 दवाखान्यांचे परवाना नूतनीकरण; आरोग्य विभागाकडून प्रक्रिया सुरू

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे 890 खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 410 दवाखान्यांचे नूतनीकरण 2024 ते 2027 या कालावधीत होणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये 268 दवाखान्यांच्या परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दवाखान्यांच्या परवाना नूतनीकरण प्रक्रियेसाठी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये स्पेशल ड्राइव्ह राबविण्यात आला. यामध्ये परिमंडल वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांनी दवाखान्यांच्या भेटीदरम्यान आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन केले. त्यामुळे रुग्णालयांच्या नूतनीकरण प्रस्ताव प्रक्रियेला वेग आला आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी दिली.
रुग्णालयांना कागदपत्रांची यादी देण्यात आली असून, त्यांनी आरोग्य विभागाला आवश्यक माहिती ई-मेलवर पाठवली. स्पेशल ड्राइव्हअंतर्गत तीन वैद्यकीय अधिकार्‍यांच्या टीमने कागदपत्रे तपासून चलन दिले. दर तीन वर्षांनी रुग्णालयांनी परवान्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अग्निशमन दलाचे ’ना हरकत’ प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे असल्यानंतरच परवाना दिला जातो.
पाच खाटांच्या रुग्णालयांचे शुल्क 5 हजार रुपये, तर 6 ते 10 खाटांच्या रुग्णालयांचे शुल्क 10 हजार रुपये असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
शहरातील 410 नोंदणीकृत रुग्णालयांचे 2024-2027 या कालावधीत परवाना नूतनीकरण होणे अपेक्षित आहे. रुग्णालयांचा वेळ वाचावा आणि प्रक्रिया गतिमान व्हावी, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये 268 रुग्णालयांच्या प्रस्तावाचे काम सुरू करण्यात आले आहे.
डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

हेही वाचा

Pune : आचारसंहितेचा भंग न होणाऱ्या फ्लेक्सलाच परवानगी..
रेल्वे स्थानकातील दुकानात भरदिवसा मद्यपान; आरपीएफकडून कारवाई
काळजी घ्या ! पुण्याचा पारा वाढताच; कोरेगाव पार्कचे तापमान 42 अंशांवर

Latest Marathi News पुणे : 268 दवाखान्यांचे परवाना नूतनीकरण; आरोग्य विभागाकडून प्रक्रिया सुरू Brought to You By : Bharat Live News Media.