ऑटिस्टिक मुले स्वमग्नतेकडून जाताहेत स्वमदतीकडे!

पुणे : राघव कृष्णन या ऑटिस्टिक विद्यार्थ्याच्या 13 तास 12 मिनिटे पोहण्याच्या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली आहे. आशुतोष साळुंखे हा दहावी पास झालेला शहरातील पहिला ऑटिस्टिक मुलगा! त्याने लेखनिकाची मदत न घेता उत्तरपत्रिका लिहिल्या. त्याने हार्मोनियमच्या 4 परीक्षाही दिल्या आहेत. स्वमग्नतेकडून स्वमदतीकडे जाणार्‍या ऑटिस्टिक मुलांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. स्वमग्नता … The post ऑटिस्टिक मुले स्वमग्नतेकडून जाताहेत स्वमदतीकडे! appeared first on पुढारी.

ऑटिस्टिक मुले स्वमग्नतेकडून जाताहेत स्वमदतीकडे!

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : राघव कृष्णन या ऑटिस्टिक विद्यार्थ्याच्या 13 तास 12 मिनिटे पोहण्याच्या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली आहे. आशुतोष साळुंखे हा दहावी पास झालेला शहरातील पहिला ऑटिस्टिक मुलगा! त्याने लेखनिकाची मदत न घेता उत्तरपत्रिका लिहिल्या. त्याने हार्मोनियमच्या 4 परीक्षाही दिल्या आहेत. स्वमग्नतेकडून स्वमदतीकडे जाणार्‍या ऑटिस्टिक मुलांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
स्वमग्नता (ऑटिझम) हा आजार नसून ही मुलांच्या वाढीच्या वयात दिसणारी एक गुंतागुंतीची वैकासिक समस्या आहे. स्वमग्न (ऑटिस्टिक) मुले टाकाऊ नसून, समाजाला कोणत्या ना कोणत्या रूपाने उपयोगी पडणारे घटकच आहेत. त्यांना समाजाकडून सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्यास ते यशाचे शिखर गाठू शकतात, याकडे प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा साधना गोडबोले यांनी लक्ष
वेधले आहे. स्वमग्न मुले वास्तव परिस्थितीपासून अलिप्त राहतात. यामध्ये भाषेच्या देवाणघेवाणीची समस्या असते. मुलांना स्वतःला काय हवे आहे ते सांगताना अडचण येते. त्याचप्रमाणे आई-वडील, जवळपासचे लोक आपल्याला काय सांगतात ते त्यांना समजत नाही. मुलांमध्ये मुलींपेक्षा स्वमग्नतेचे प्रमाण जास्त असून, हे प्रमाण 4:1 आहे आणि 75 टक्के मुलांमध्ये अध्ययन अक्षमता असू शकते, असे वैद्यकतज्ज्ञ सांगतात.
स्वमग्न मुलांची लक्षणे

नजरेला नजर मिळवता न येणे
आवाजाला प्रतिसाद न देणे
स्वतःच्या कोषात राहायला आवडणे
50% मुलांना कधीही बोलता न येणे
अतिचंचल असणे, इंद्रियांचे समतोल एकत्रीकरण नसणे
अतिसंवेदनशीलता
वर्तन समस्या
भावनिक विकास समस्या

प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये मुलांना आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार चौरस जेवण दिले जाते. स्वमग्न मुलांच्या समस्या लक्षात घेऊन गरजेनुसार ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेविअरल थेरपी ह्या महत्त्वाच्या पद्धतींचा वापर केला जातो. यांसह योगासने, संगीत, नृत्य, चित्रबोली असे उपक्रम घेतले जातात. सध्या सेंटरमध्ये 3 ते 17 वर्षे 43 मुले आहेत. मुलांच्या अपेक्षित विकासासाठी पालकांचा सहभागही आवश्यक असतो. त्यादृष्टीने पालकांना मार्गदर्शन व मदत केली जाते. मुलांचे अंगभूत कलागुण शोधून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
– साधना गोडबोले,
कार्यकारी अध्यक्ष, प्रसन्न ऑटिझम सेंटर
स्वमग्नता नेमकी कशामुळे होते?
स्वमग्नतेस कारणीभूत असू शकणार्‍या काही कारणांपैकी मुख्य कारण म्हणजे आनुवंशिकता. याव्यतिरिक्त मातेच्या गरोदरपणात दिली जाणारी काही विशिष्ट औषधे, उदा. वाढलेला रक्तदाब. मधुमेहासाठी दिली जाणारी औषधे, आई-वडिलांचे वाढलेले वय, अल्कोहोलचे सेवन, मातेचे कुपोषण किंवा प्रसूतीदरम्यान होणारी गुंतागुंत ही देखील आणखी काही कारणे असू शकतात.
हेही वाचा

आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले : देवेेंद्र फडणवीस
राज्यात पुन्हा अवकाळीचा मारा
भावना गवळी, हेमंत पाटलांचा पत्ता कट; शिंदे शिवसेनेला धक्का

Latest Marathi News ऑटिस्टिक मुले स्वमग्नतेकडून जाताहेत स्वमदतीकडे! Brought to You By : Bharat Live News Media.