जिंकण्यासाठी ‘साम, दाम, दंड,भेद’; नारायण राणेंचा इशारा

जिंकण्यासाठी ‘साम, दाम, दंड,भेद’; नारायण राणेंचा इशारा

कुडाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी कुडाळात जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्‍यांचा मेळावा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही देशाची गरज आहे, त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’च्या माध्यमातून ही निवडणूक आपण लढवूया. काही झालं तरी या ठिकाणी भाजपचाच खासदार निवडून आणूया. कोणत्याही परिस्थितीत येथील विद्यमान खासदारांना परत विजयाची संधी देणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. आता मी आलोच आहे, जास्त बडबड कराल तर तुमच्या जाहीर सभेत मी स्टेजवर आलोच म्हणून समजा, असा सूचक इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
भाजप सिंधुदुर्गची संघटनात्मक आढावा बैठक कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे बुधवारी झाली.
ना. राणे म्हणाले, निवडणुका होईपर्यंत आपण कोणती विकासकामे करतो, त्याची परीक्षा या निवडणुकीत होणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर मला अभिमान आहे. सिंधुदुर्गातील माझे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत. हा माझा अभिमान सार्थकी लावा, मतभेद विसरून कामाला लागा, असा संदेश त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. माझ्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामायण यांनीही कौतुक केले. मात्र, जिल्ह्यातील विरोधकांना याचे कौतुक नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Latest Marathi News जिंकण्यासाठी ‘साम, दाम, दंड,भेद’; नारायण राणेंचा इशारा Brought to You By : Bharat Live News Media.