आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: आज तुम्‍ही व्यावहारिक कौशल्याने अपूर्ण काम पूर्ण करू शकाल. तुमची प्रशंसा देखील होईल. जवळच्या मित्राला मदत कराल. कौटुंबिक कामांनाही प्राधान्य द्याल. मुलांच्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी तुमचे योगदान आवश्यक आहे, असे श्रीगणेश सांगतात. भागीदारीशी संबंधित व्यवसायात एकमेकांची साथ देणे आवश्‍यक. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.
वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्‍हाला मित्राला आर्थिक मदत करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांसह घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ जाईल. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ व्‍यतित कराल. तरुणांनी करिअरला प्राधान्य द्यावे. व्यवसायात कोणतीही नवीन योजना हाती घेताना काळजीपूर्वक विचार करा. घरापतील सुव्यवस्था राखण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांशी सुसंवाद साधणे गरजेचे. प्रकृती चांगली राहील.
मिथुन : आज एखाद्या विशिष्ट विषयावर तुमचे लक्ष केंद्रित होईल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्य करणाऱ्या लोकांसोबत वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला मानसिक शांती लाभेल. इतरांना तुमच्‍या कामात ढवळाढवळ करू देवू नका. यामुळे नात्यातील मतभेद वाढतील. जमीन खरेदी-विक्रीशी संबंधितीचे काम आज टाळावे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. घरातील वातावरण आनंदी राहिल. पोटविकारच्‍या समस्या जाणवू शकतात.
कर्क : आज तुमच्या आवडीच्या कामांना थोडा वेळ द्‍या. त्‍यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवाल. भूतकाळातील नकारात्मक गोष्टींमुळे त्रास होणार नाही, याची काळजी घ्‍या. अन्‍यथा जवळच्या व्यक्तीसोबतचे नातेही खराब होऊ शकते. सार्वजनिक कामासह विपणनाशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवनात योग्य सामंजस्य राहिल. सर्दी-खोकल्याचा त्रास होण्‍याची शक्‍यता.
सिंह: आज वैयक्तिक बाबींमध्ये इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्‍या, असे श्रीगणेश सांगतात. घरामध्ये काही बदलाचे बेत आखले जातील. काळानुरूप आपली जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल शिस्तबद्ध असल्‍यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. व्यवसायात कर्मचार्‍यांचा सल्ल्याला महत्त्व द्या. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. अति कामामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
कन्या : आज नातेवाईक किंवा जवळच्या मित्रांची उपस्थिती आनंदी वातावरण निर्माण करेल, असे श्रीगणेश सांगतात. मुलांबाबतची चिंता दूर होईल. धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवा. आज कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी होवू नका. वाद टाळा अन्यथा समाजात तुमची प्रतिमा बिघडू शकते. कोणत्‍याही कामात संयम आवश्‍यक आहे. व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी घरातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात योग्य सौहार्द राखला जाईल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल.
तूळ: आज काही विशेष यश मिळू शकते, असे श्रीगणेश म्‍हणतात. तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळू शकते. घराच्या देखभालीच्या कामात सुधारणा करता येतील. आत्मपरीक्षणासह आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी थोडा वेळ घालवा. रागावर नियंत्रण ठेवा. मुलांबद्दल नकारात्मक माहिती मिळाल्‍याने चिंता वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. सांधेदुखी वाढू शकते.
वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, ग्रहमान अनुकूल आहे. चिंता आणि तणाव दूर होईल. भावांसोबतही नाते मधुर होऊन कौटुंबिक वातावरणात सुखद बदल घडून येतील. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांचे विचार समजून घ्यावेत. व्यवसायाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. घरात आनंदी वातावरण राहील. ॲलर्जीशी संबंधित समस्या जाणवू शकते.
धनु: तुमच्यासाठी आज काळ अनुकूल आहे. विशिष्ट प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता. तुमच्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍वाने लोक प्रभावित होतील. अयोग्य गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यवहारात संयम आणि सौम्यता आवश्यक आहे. जुन्या मालमत्तेशी संबंधित समस्येवर तोडगा काढणे कठीण आहे. भागीदारीशी संबंधित व्यवसायातील जुने मतभेद दूर होऊ शकतात. तुम्ही सर्व सुखसोयींची काळजी घेतली पाहिजे. तब्येत थोडी नरम राहू शकते.
मकर: तुमच्या मनातील स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. घरात अचानक पाहुणे आल्याने चिंता वाढेल. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. शेजाऱ्यांशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय त्वरित घ्यावे लागतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंददायी आणि योग्य सामंजस्य असू शकते.आज लोकांशी भेट होईल, . एखाद्या कार्यक्रमाला जाण्याची संधी असू शकते.
कुंभ: आज शहाणपणाने घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतो, असे श्रीगणेश सांगतात. तुमची क्षमता आणि योग्य कार्यपद्धती तुम्हाला तुमच्या कामात अधिक गती देईल. तरुणांना व्यवसायाच्या बाबतीत विश्वासघात होऊ शकतो. बऱ्याचदा जास्त विचार केल्याने महत्त्वाचे यश चुकू शकते. तुमच्या व्यावसायिक कामांमध्ये बाहेरील व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नका. वैवाहिक जीवनात काही विसंगती असू शकते. तब्येत थोडी कमजोर असू शकते, असे श्रीगणेश सांगतात.
मीन: श्रीगणेश म्‍हणतात की, संधीचा योग्‍य फायदा घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार योग्य निकालही मिळेल. काही खर्च अचानक वाढू शकतात. आर्थिक नियोजन महत्त्‍वाचे. व्यावसायिक बाबतीत तुमची समज आणि योग्यता तुम्हाला यश मिळवून देईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राखण्यात काही अडचणी येतील. तुमची दैनंदिन दिनचर्या आणि आहार व्यवस्थित ठेवल्याने तुम्हाला निरोगी वाटेल.
Latest Marathi News आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.