नागपूर : किशोर गजभिये यांचा काँग्रेसला रामराम!

नागपूर : किशोर गजभिये यांचा काँग्रेसला रामराम!

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात असलेले काँग्रेसतर्फे गेल्यावेळी निवडणूक लढलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकल्याची माहिती आहे. पक्षाने आपल्यावर कारवाई केली तरी चालेल मात्र मी स्वतःहून पक्ष सोडणार नाही अशी कालपर्यंत भूमिका घेणारे गजभिये आता कुठला पवित्रा घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर रामटेकमध्ये आता 28 उमेदवार रिंगणात आहेत.उद्धव ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे, काँग्रेसचेच दर्शनी धवड, नरेश बर्वे यांनी अपक्ष म्हणून आपले अर्ज मागे घेतले.
माजी मंत्री सुनील केदार गटाचे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी गेल्यावेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी आपला अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवल्याने, या बंडखोरीने महाविकास आघाडीची चिंता वाढविली आहे. त्यांना प्रेशर कुकर निवडणूक चिन्ह असल्याने ते कुणाचे प्रेशर वाढविणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यांच्या माघारीसाठी बरेच प्रयत्न झाले, त्यांचा फोनही नॉट रिचेबल होता. आपण रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रामुळे अर्ज बाद झाल्यास आपल्याला काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळावी अशी वारंवार मागणी केली मात्र मला संधी नाकारली गेली. हा अर्ज रद्द होऊ शकतो अशी पूर्वकल्पना हायकमांडला दिली पण लक्ष दिले नाही पर्यायी उमेदवारी मी गेल्यावेळी लढून 4 लाख 70 हजार मते घेऊन आणि गेली पाच वर्षे मी सतत जनतेच्या संपर्कात असताना,एक आयएएस अधिकारी,प्रशासकीय अनुभव असून मला संधी नाकारली ही बाब आपल्या जिव्हारी लागली. पक्षाने माझ्यावर कारवाई करावी, आपल्याला कारवाईची बडतर्फीची चिंता नाही अशी भूमिकाही किशोर गजभिये यांनी बोलून दाखविली होती हे विशेष.
Latest Marathi News नागपूर : किशोर गजभिये यांचा काँग्रेसला रामराम! Brought to You By : Bharat Live News Media.