गडहिंग्लजमध्ये दोन हजारांची लाच घेताना महिला हवालदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : गुन्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत रंगेहाथ पकडले. रेखा भैरू लोहार असे कारवाई करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचारीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील हेड काॅन्स्टेबल रेखा लोहार यांच्याविरोधात याच पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली. या तक्रारीनंतर आज (दि. २) दोन … The post गडहिंग्लजमध्ये दोन हजारांची लाच घेताना महिला हवालदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

गडहिंग्लजमध्ये दोन हजारांची लाच घेताना महिला हवालदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

गडहिंग्लज; Bharat Live News Media वृत्तसेवा : गुन्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत रंगेहाथ पकडले. रेखा भैरू लोहार असे कारवाई करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचारीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील हेड काॅन्स्टेबल रेखा लोहार यांच्याविरोधात याच पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली. या तक्रारीनंतर आज (दि. २) दोन हजार रुपयांची लाच घेताना रेखा लोहार यांना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडत कारवाई केली. आज (दि. २) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई झाली. गडहिंग्लज पोलीस ठाण्यामध्येच ही कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तक्रारदार हा लोहार यांना भेटायला आला होता याच वेळी लाचलुचपत विभागाचे अधिकारीही सापळा लावून बसले होते. लाचेची रक्कम स्वीकारताच लोहार यांच्यावर कारवाई करण्यात आली
Latest Marathi News गडहिंग्लजमध्ये दोन हजारांची लाच घेताना महिला हवालदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.