तरुणाईच्या भावनेला हात घालून राहुल गांधींचा पीएम मोदींवर निशाणा, म्हणाले..

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रचारात सोशल मीडियाचा वापर हे प्रभावी शस्त्र ठरले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यासाठी ‘एक्स’ अर्थात पूर्वीच्या ट्विटरचा वापर करून देशभरातील युवकांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी एका युवकाने पाठविलेला व्हिडिओ शेअर करून मोदी यांचा “प्रपोगंडा” … The post तरुणाईच्या भावनेला हात घालून राहुल गांधींचा पीएम मोदींवर निशाणा, म्हणाले.. appeared first on पुढारी.

तरुणाईच्या भावनेला हात घालून राहुल गांधींचा पीएम मोदींवर निशाणा, म्हणाले..

ताजेश काळे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रचारात सोशल मीडियाचा वापर हे प्रभावी शस्त्र ठरले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यासाठी ‘एक्स’ अर्थात पूर्वीच्या ट्विटरचा वापर करून देशभरातील युवकांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी एका युवकाने पाठविलेला व्हिडिओ शेअर करून मोदी यांचा “प्रपोगंडा” आता चालणार नाही, असा इशारा दिला आहे.
आज एका तरुणाने मला ‘हा’ व्हिडीओ पाठवला आहे. आता संभ्रमाचे आणि भीतीचे जाळे तोडून सत्य बाहेर येत आहे. प्रपोगंडाच्या बापाची डाळ आता शिजणार नाही. जनताच त्यांना आरसा दाखवायला तयार आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी एक्सवरुन पंतप्रधान मोदींवर हल्ला चढविला आहे.
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध थांबविले, असा प्रश्न विचारला असता, एका तरुणीने मोदी यांना “पापा” संबोधून हा सगळा प्रपोगंडा आहे. त्यांनी युद्ध थांबविले तर मग मणिपूर आणि लद्दाखमध्ये जो संघर्ष सुरू आहे. तो पापा म्हणजे, मोदी यांना का थांबवता आला नाही, असा सवाल या तरुणीने विचारला आहे.
इलेक्टोरल बाँडचा हा पैसा आहे. मोदी यांना तो खर्च करायचा आहे. त्यामुळे त्यांनी युद्ध थांबवण्याचा प्रपोगंडा सुरू केला असल्याचेही या तरुणीने व्हिडीओत म्हटले आहे. राहुल गांधी यांनी देशातील तरुणाईकडून सोशल मीडियाचा जास्त वापर होत असल्याचे बघून प्रचारासाठी हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा :

नागपुरात प्रचार जोरात, ठाकरे पवारांच्या भेटीला, फडणवीस गडकरींच्या मदतीला
Anil Parab on Kirit Somaiya : रामदास कदमसह दोन्ही मुलांना तुरुंगात टाकणार का?: अनिल परबांचा सोमय्यांवर निशाणा
जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप! दोन बडे नेते कमळाची साथ सोडून मशाल हाती घेणार

Latest Marathi News तरुणाईच्या भावनेला हात घालून राहुल गांधींचा पीएम मोदींवर निशाणा, म्हणाले.. Brought to You By : Bharat Live News Media.