ईव्हीएमने निवडणूक प्रक्रियेत सुधारणेची गरज : शरद पवार

ईव्हीएमने निवडणूक प्रक्रियेत सुधारणेची गरज : शरद पवार

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : ईव्हीएम संदर्भात देशभरातील लोकांच्या जनभावनांचा विचार करता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएमने निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. या संदर्भात आम्ही सर्व विरोधकांनी एकत्रितपणे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवेदनही दिले आहे अशी माहिती पत्र परिषदेत दिली. यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता कायम राहील यावर भर देत सातारा, बारामती या दोन्ही जागा आम्ही जिंकू असा दावा केला. शिरूरच्या लोकसभा जागेवर डॉ अमोल कोल्हे विजयी होतील, निकालात ते स्पष्ट झालेले दिसेल असे एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले. मंगळवारी वर्धा लोकसभा मतदारसंघात अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार नागपुरात आले होते. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, प्रकाश गजभिये ,दूनेश्वर पेठे, राजाभाऊ टाकसाळे,रमण ठवकर आदी उपस्थित होते.
Latest Marathi News ईव्हीएमने निवडणूक प्रक्रियेत सुधारणेची गरज : शरद पवार Brought to You By : Bharat Live News Media.