भंडारा : तुमसर-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार

भंडारा : तुमसर-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार

भंडारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव दुचाकीची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (दि.४) तुमसर-बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर माऊली पेट्रोल पंपसमोर घडला. या अपघातात अतुल गुर्वे (वय ३०, रा. शहर वॉर्ड तुमसर ) याचा मृत्यू झाला असून राम गुर्वे ( वय ३३, रा. नवरगाव ) हा गंभीर जखमी आहे. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, अतुल गुर्वे व राम गुर्वे हे दोघे दुचाकीवरून सिहोराकडे जात होते. तुमसर-बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीसमोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटले व भरधाव दुचाकीची ट्रकला धडक बसली. अपघातादरम्यान दुचाकीचे हँडल ट्रकच्या मागच्या भागात फसले. त्यामुळे दोघांसह दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली. त्यात अतुल गुर्वे व राम गुर्वे हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी दोघांना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान अतुल गुर्वे याचा मृत्यू झाला.
हेही वाचा : 

परभणी : विद्युत तारेच्या स्पर्शाने म्हशीचा मृत्यू
हृदयद्रावक! दिल्‍लीत घराला आग, दोन मुलींचा गुदमरून मृत्यू
Sangli News: आगळगाव येथे भीषण अपघातात ३ ऊस तोडणी कामगारांसह चिमकुली ठार

Latest Marathi News भंडारा : तुमसर-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार Brought to You By : Bharat Live News Media.