बारामती सहकारी बॅंकेला ६७ कोटींचा ढोबळ नफा : बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव यांची माहिती

बारामती सहकारी बॅंकेला ६७ कोटींचा ढोबळ नफा : बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव यांची माहिती

बारामती;  Bharat Live News Media वृत्तसेवा :  बारामती सहकारी बॅंकेने ३१ मार्च २०२४ च्या आर्थिक वर्षाअखेरीस ३ हजार ५८४ कोटींचा व्यवसाय केला आहे. ६७.४० कोटी रुपये तरतूद पूर्व ढोबळ नफा बॅंकेला मिळाला असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.

बॅंकेला आजवर मिळालेल्या ढोबळ नफ्यामध्ये यंदाचा नफा विक्रमी आहे. सर्व तरतूदी पूर्ण करत बॅंकेने ५ कोटी ७० लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बॅंकेचे नक्त मूल्य १५४ कोटींवर पोहोचले असून बॅंकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसूली करत एनपीए (अनुत्पादक जिंदगी) प्रमाण कमी करण्यात यश प्राप्त केले आहे.

बारामती सहकारी बॅंकेचे पुणे, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक व रायगड अशा सहा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असून ३६ शाखा व एका विस्तारीत कक्षाद्वारे कामकाज केले जात आहे. ई टॅक्स, ई स्टॅंपिंग, पॅन कार्ड, मोबाईल बॅंकींग, विमा सेवा, यूपीआय पेमेंट या सुविधांसह आरटीजीएस, एटीएम सुविधा दिल्या जात आहेत. बॅंकेची स्वतःची संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. लवकरच बारामती बॅंकेला रिझर्व्ह बॅंकेकडून नेट बॅंकिंगची परवानगी मिळेल, असे सातव यांनी सांगितले. बॅंकेच्या प्रगतीत उपाध्यक्ष किशोर मेहता यांच्यासह सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक रवींद्र बनकर, मुख्य सर व्यवस्थापक विनोद रावळ, सर व्यवस्थापक सोमेश्वर पवार, विजय जाधव, कर्मचारी व सभासदांचे मोठे सहकार्य असल्याचेही सातव यांनी नमूद केले.
Latest Marathi News बारामती सहकारी बॅंकेला ६७ कोटींचा ढोबळ नफा : बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव यांची माहिती Brought to You By : Bharat Live News Media.