नाशिक शहरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तिघींचा विनयभंग
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत त्यांना गर्भवती केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी मुंबईनाका व उपनगर पोलिस ठाण्यांमध्ये संशयितांविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तर शहरातील तिघा महिलांचा विनयभंग करण्यात आला आहे. विनयभंग करणाऱ्यांपैकी एक संशयित तडीपार गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे.
पहिल्या घटनेत वडाळा पाथर्डी रोड परिसरात राहणाऱ्या संशयित रोहित कडाळे (२०) याने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पीडितेच्या पालकांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने फेब्रुवारी २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत पांडवलेनी येथील एका उद्यानात पीडितेवर वारंवार अत्याचार केले. यातून पीडिता गर्भवती राहिलीव तिने एका मुलीस जन्म दिला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत वडनेर दुमाला परिसरात गत वर्षभरापासून संशयित रोशन बुटे (रा. वडनेर दुमाला) याने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करीत तिस गर्भवती केले. याप्रकरणी पीडितेच्या नातलगाने उपनगर पोलिस ठाण्यात संशयित रोशन विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पंचवटीतील संजय नगर येथे मध्यरात्री विवाहितेचा तिच्या जेठने शनिवारी (दि.३०) मध्यरात्री विनयभंग करीत मारहाण केल्याची घटना घडली. संशयिताने पीडितेच्या पतीस शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच पीडितेचा विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत तडीपार गुंडाने दाम्पत्यास मारहाण करीत पीडितेचा विनयभंग केला. भद्रकालीतील दखणीपुरा येथे सोमवारी (दि.१) सकाळी १०.३० वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित अब्दुल लतिफ यासीन कोकणी (४६, रा. दखणीपुरा) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसऱ्या घटनेत दोघा भावांनी मिळून महिलेसह तिच्या भावास मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना २८ मार्चला डावखरवाडी परिसरात घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, पोलिसांकडे तक्रार का केली अशी कुरापत काढून संशयित विवेद गायकवाड व विशाल गायकवाड यांनी पीडितेस शिवीगाळ करीत विनयभंग केला. तसेच पीडितेसह तिच्या भावास मारहाण करीत दमदाटी केली. याप्रकरणी उपनगर पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा –
Delhi Excise Policy Case | मनी लाँड्रिंग प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांना मोठा दिलासा, जामीन मंजूर
पोलीस निरीक्षकाने व्यावसायिकाला रस्त्यात अडवून लुटले; साथीदारांसह एकाला अटक
Odisha Assembly Election 2024: ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ११२ उमेदवारांची यादी जाहीर
Latest Marathi News नाशिक शहरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तिघींचा विनयभंग Brought to You By : Bharat Live News Media.