मतदारसंघ एक; मात्र दोघे लोकसभेवर

मतदारसंघ एक; मात्र दोघे लोकसभेवर

एकाच मतदार संघातून दोघे जण लोकसभेवर निवडून गेले, असे कोणी सांगितले तर त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर 1951 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी राखीव जागांची पद्धत नव्हती. त्यामुळे 89 मतदार संघांतून खुल्या प्रवर्गातून पहिला उमेदवार आणि दुसरा उमेदवार अनुसूचित जाती व जमातीतील असायचा.
एका व्यक्तीला तेव्हा अशा मतदार संघात दोनदा मतदान करावे लागायचे. तथापि, आपली दोन्ही मते एकाच उमेदवाराला देण्याची सवलत नव्हती. 1957 मधील निवडणुकीत 90 मतदार संघांतून प्रत्येकी दोन खासदार लोकसभेवर निवडून गेले. 1962 च्या निवडणुकीपासून ही पद्धत बंद करण्यात आली. नंतरच्या काळात राखीव मतदारसं घांची घोषणा झाल्यामुळे एका मतदार संघातून केवळ एकच खासदार लोकसभेवर जाऊ लागला. सध्या देशभरात अनुसूचित जातींसाठी 84, तर अनुसूचित जमातींसाठी 47 लोकसभा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील मतदार संघांची संख्या 412 आहे.
Latest Marathi News मतदारसंघ एक; मात्र दोघे लोकसभेवर Brought to You By : Bharat Live News Media.