आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

 
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : श्रीगणेश सांगतात की, आज तुमच्या उदार आणि संवेदनशील कृतीने लोक प्रभावित होतील. संवादातून उपक्रम मार्गी लावा. मित्रांशी संपर्क मजबूत करा. घरातील सुखसोयींशी संबंधित कामातही वेळ चांगला जाईल. सध्या व्यावसायिक उपक्रमात कोणतेही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. जोडीदाराचे सहकार्य राहिल. बदलत्‍या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. यामुळे आर्थिक आणि व्यावसायिक बाबींमध्‍ये यश लाभेल. गुणवत्तेचा सकारात्मक वापर केल्यास चांगला परिणाम मिळू शकतो. थकित आर्थिक व्‍यवहार पूर्ण करण्‍यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन: आज कौटुंबिक सुखसोयीच्‍या कामांसह खरेदीत वेळ व्‍यतित कराल. कुटुंबातील सदस्यांच्‍या प्राधान्य द्या. आर्थिक गुंतवणुकीच्या बाबींचीही योजना राबवाल, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायाच्या जागेच्या अंतर्गत किंवा देखरेखीमध्ये थोडासा बदल करा. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्‍यावे लागले. घर आणि व्यवसायाच्या सर्व जबाबदाऱ्या तुमच्यावर असतील.
कर्क : आज खर्चाचे प्रमाण वाढेल;पण उत्पन्नाचे स्त्रोत मिळण्‍याने खर्चाची चिंता राहणार नाही, असे श्रीगणेश म्‍हणतात.
शेअर मार्केट किंवा पॉलिसी इत्यादीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. खूप
व्‍यावहारिक विचार नाते बिघडवू शकतो. प्रभावशाली व्यक्तीचा सल्ला व्यवसायात तुम्हाला नवीन यश मिळवण्यास मदत करेल. पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होऊ शकतो.
सिंह: मालमत्ता विक्री संदर्भात विचार करत असाल तर यावर लक्ष केंद्रीत करा. अनोळखी व्यक्तीबरोबर झालेली भेट फायद्याची ठरू शकते. घरातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीची चिंता राहिल. महत्त्‍वाची कागदपत्रे गहाळ होणार नाहीत, याची काळजी घ्‍या. निष्काळजीपणामुळे नुकसान होवू शकते. गोंधळाच्या परिस्थितीत कोणाचाही सल्‍ला घेवून मार्ग काढण्‍याचा विचार करू नका. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
कन्या: ग्रहस्थिती अनुकूल आहे. मात्र याचा वापर कसा करावे हे आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे. कुटुंबात कोणतेही धार्मिक नियोजन देखील शक्य आहे. संशयी स्वभाव तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. व्यावसायिक उपक्रम पुन्हा सुरू करता येतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. वाहन चालवताना काळजी घ्‍या.
तूळ: आज मुलाच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येबद्दल योग्य सल्ला आणि मदत घ्या. तुमचा ताण दूर होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढेल. तरुणांनी स्‍वत:ला वाईट सवयी आणि संगतीपासून दूर ठेवावे. विकसित होत असलेल्या व्यवसाय योजनेवर लक्ष केंद्रित करा. घरातील वातावरण आनंदी राहिल, असे श्रीगणेश सांगतात.
वृश्चिक : मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. आत्मविश्वासाने नवीन योजना पूर्ण करण्याचा प्रयत्‍न कराल. भावांसोबत नातेसंबंध टिकवून ठेवणे हे आपल्यावर अवलंबून आहे. परिश्रमानुसार आज कार्यक्षेत्रात अधिक यश मिळेल. जोडीदारासोबतचे भावनिक बंध अधिक घट्ट होतील.
धनु : धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ व्‍यतित केल्‍यास दररोजच्या तणावातून मुक्त होण्याचा मार्ग मिळेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यावर गांभीर्याने विचार करा. कोणत्‍याही कागदपत्रावर सही करताना काळजी घ्‍या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. आर्थिक आघाडीवर सध्‍या संथपणा अनुभवाल. भागीदारीशी संबंधित व्यवसायात पारदर्शकता राखणे महत्त्वाचे आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते.
मकर: श्रीगणेश म्हणतात की, मित्राला संकटात मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. जवळच्या नातेवाईकांसोबत गाठीभेटीमुळे सुखावाल. मुलाच्या करिअरशी संबंधित आत्मविश्वास टिकवून ठेवणे गरजेचे आहे. बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे पती-पत्नी आणि कुटुंबात काही गैरसमज होऊ शकतात.
कुंभ: तुमच्‍या अति भावनिक आणि उदार स्वभावाचा काहीजण गैरफायदा घेऊ शकतात. प्रत्येक काम प्रत्यक्ष व्यवहारात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. संतती पक्षाकडून समाधानकारक निकाल मिळाल्यानेही दिलासा मिळेल. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित काम यशस्वी होऊ शकते. पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होऊ शकतो.
मीन : आज नातेवाईकांसह शेजार्‍यांशी संबंध चांगले ठेवता येतील. तुमच्या कार्यक्षमतेची प्रशंसा होईल. सर्जनशील कार्यातही वेळ जाईल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्यात ऊर्जा आणि आत्मविश्वासाची कमतरता असू शकते.
Latest Marathi News आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.