महाएफपीसी, पुणे संस्थेस हमीभावानुसार खरेदी प्रक्रियेत मनाई; वॅपकोची राज्यस्तरीय संस्थेची मान्यता रद्द     

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगाम 2023-24 किमान हमीभावाअंतर्गत खरेदी प्रक्रिया राबविण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत खरेदी प्रक्रियेमध्ये विविध प्रकारच्या अनियमितताविषयक तक्रारीच्या अनुषंगाने वॅपको या संस्थेची राज्यस्तरीय संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली असून महाएफपीसी, पुणे या संस्थेस हमीभावानुसार खरेदी प्रक्रियेत सहभाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार किमान हमीभाव योजनेंतर्गत … The post महाएफपीसी, पुणे संस्थेस हमीभावानुसार खरेदी प्रक्रियेत मनाई; वॅपकोची राज्यस्तरीय संस्थेची मान्यता रद्द      appeared first on पुढारी.

महाएफपीसी, पुणे संस्थेस हमीभावानुसार खरेदी प्रक्रियेत मनाई; वॅपकोची राज्यस्तरीय संस्थेची मान्यता रद्द     

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : खरीप हंगाम 2023-24 किमान हमीभावाअंतर्गत खरेदी प्रक्रिया राबविण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत खरेदी प्रक्रियेमध्ये विविध प्रकारच्या अनियमितताविषयक तक्रारीच्या अनुषंगाने वॅपको या संस्थेची राज्यस्तरीय संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली असून महाएफपीसी, पुणे या संस्थेस हमीभावानुसार खरेदी प्रक्रियेत सहभाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार किमान हमीभाव योजनेंतर्गत कडधान्य व तेलबिया यांची केंद्रीय नोडल एजन्सी (CNA) मार्फत राज्यस्तरीय संस्थांद्वारे खरेदी प्रक्रिया राबविली जाते. शेतकरी हा केंद्रबिंदू विचारात घेऊन सदर प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. खरेदी प्रक्रियेच्या अनुषंगाने संबंधित संस्थेकडे उपलब्ध सुविधा व साधनसामुग्रीचा आढावा घेऊन खरेदी केंद्र निश्चित करण्याचे काम नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सींना राज्य शासनासह समनव्याने करण्याचे अपर मुख्य सचिव (सहकार व पणन) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार हरभरा या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत ३.४९ लाख हेक्टर इतकी घट झाली असून पाण्याची कमी उपलब्धता व प्रतिकूल हवामानामुळे एकूण उत्पादनात ९.७२ लाख मे. टन इतकी घट झाल्याचे त्याचप्रमाणे प्रति हेक्टरी उत्पादकता देखील गेल्या वर्षाच्या तुलने कमी आहे. त्याचप्रमाणे तूर या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र व एकूण उत्पादनात गेल्या वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली आहे.

सध्या हरभराचे बाजारभाव ५५००/- ते रु.५८००/- प्रति क्विंटल असून ते किमान आधारभूत दराच्या (रु.५,४४०/- प्रति क्विंटल) जवळपास आहेत. सध्या हरभरामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे, मात्र वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढल्यानंतर आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन हरभरा या पिकाचे बाजारभाव पुढील काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Latest Marathi News महाएफपीसी, पुणे संस्थेस हमीभावानुसार खरेदी प्रक्रियेत मनाई; वॅपकोची राज्यस्तरीय संस्थेची मान्यता रद्द      Brought to You By : Bharat Live News Media.