बीड : दुचाकीच्या कर्णकर्कश सायलेन्सरच्या आवाजावर आष्टी पोलिसांची थेट कारवाई
आष्टी; Bharat Live News Media वृत्तसेवा : आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी पदभार घेतल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे. अनेक समाज उपयोगी उपक्रम देखील राबविले आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईने अवैध धंद्येवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.काल (दि.३१ मार्च पासून दुचाकीच्या कर्णकर्कश सायलेन्सरच्या आवाजावर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. तिघा जणांना सायलेंसरमध्ये छेडछाड करणे चांगलेच महागात पडले आहे.
पोलिसांकडून विनाकारण दंगा करणारांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.आष्टी पोलिस वाहतूक पोलिसांची थेट कारवाई करीत काही दुचाकीधारकांना दंड ठोठावला आहे. शहरात तरुण मुले, बुलेट व इतर दुचाकीचा सायलेंसर बदलून मोठा आवाज करणारा किंवा फटाक्यांसारखा आवाज करणारा सायलेंसर लावतात व शांतप्रिय वस्तीमध्ये जाऊन तसेच मुख्य रस्त्यावर जाऊन गाडी अती वेगाने चालवतात. या सायलेन्सरचा खूप मोठ्या प्रमाणात आवाज करून सर्वसामान्य जनतेस त्रास वाहतुकीचे नियम मोडणामुळे होत आहे.सायलेंसरमध्ये छेडछाड करुन फटका आवाजाचे सायलेंसर काढून कंपनीचे सायलेंसर बसवुन घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई दररोज च करण्यात येणार आहे. कोणी चालक फटाका आवाज काढून वाहन चालवीत असतील त्यांची माहिती कळवावी.नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी केले आहे.
आष्टी शहरात बुलेटच्या फायरिंगमध्ये आवाजात कृत्रिम बदल करून कर्कश आवाज करत फिरणार्या बुलेटस्वारांच्या बुलेट गाडीवर रविवारी आष्टी वाहतूक शाखेने कारवाईचा हिसका दाखविला. यावर आष्टी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.तिघा जणांकडून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.तसेच बुलेट गाडीचा मोठ्या आवाजाचा सायलेंसर काढून टाकण्यात आले.तसेच तुमच्या आजुबाजुला अशा सायलेंसर बदलुन मोठा आवाज करणारा किंवा फटाके सारखा आवाज करत असणार्या दुचाकी गाडीचा नंबर वाहतुक पोलिसांना देण्यात यावा किंवा त्या गाडीच्या नंबरचा फोटो काढुन 9561713194 या क्रमांकावर माहीती देण्यात यावी. तसेच ज्यांच्याकडे अशा मोठ्या आवाजाचे बुलेट गाडीवर सायलेंसर बसविले असतील त्यांनी तत्काळ सायलेंसर बदलुन कंपनीचे सायलेंसर बसवुन घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पो.शि.व्ही.आर.गुंडाळे, पो.शि.कृष्णा कन्हेरे आदींनी केली आहे.
Latest Marathi News बीड : दुचाकीच्या कर्णकर्कश सायलेन्सरच्या आवाजावर आष्टी पोलिसांची थेट कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.