डायल 112 प्रणाली अचूकपणे राबवल्याने धुळे जिल्हा राज्यात तृतीय स्थानी
धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- डायल 112 या प्रणालीच्या माध्यमातून गरजू असणाऱ्या व्यक्तीस चार मिनिटाच्या आत पोलिसांची मदत पोहोचविल्याने धुळे जिल्हा महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानावर आला असून नाशिक परिक्षेत्रात धुळे जिल्हा प्रथम क्रमांकावर आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अचूक नियोजनामुळे धुळे जिल्ह्याला हा बहुमान मिळाला असून डायल 112 राबवणाऱ्या सर्व टीमचे आज कौतुक करण्यात आले.
धुळे येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असणाऱ्या डायल 112 या टीमचे कौतुक करण्यात आले. यात डायल ११२ कार्यप्रणाली चे प्रभारी अधिकारी सपोनिविलास ताटिकोंडलवार, महिन्द्रा डिफेन्सचे अभियंता योगेश कापडे, तुषार सोनवणे, डायल ११२ चे डिस्पॅचर पोहेकॉ वाघ, खलाणे, निकुंभे, महिला पोहेकॉ् भोई, पोना बोरसे, महीला पोकॉ शेंडगे, महीला पोकॉ चौधरी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम अंतर्गत डायल ११२ या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे होवून कॉलर (पिडीत) यास नजीकच्या एमडीटी धारकाने नेमुन दिलेल्या वेळेच्या आत मदत पोहोचविणे हे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. त्याप्रमाणे अचूक कार्यवाही करण्याच्या हेतूने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी डायल 112 च्या संपूर्ण चमुला आदेश केले.
डायल 112 म्हणजे काय
महाराष्ट्र एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टममध्ये डायल ११२ या प्रकल्पान्वये प्रथमतः पिडीत व्यक्तीने त्याला मदत मिळण्यासाठी डायल ११२ क्रमांक डायल केल्याबरोबर ही माहिती मुंबई येथील प्राथमिक संपर्क केंद्र अथवा नागपूर येथील व्दितीय संपर्क केंद्र यांना पोहोच होते. या माहितीच्या आधारावर हा कॉल धुळे जिल्हा घटकाचे डायल ११२ नियंत्रण कक्ष येथील डिस्पॅचर यांचेकडे केला जातो. कॉल प्राप्त होताच डिस्पॅचर हे सदरचा कॉल पिडीत व्यक्तीच्या नजीकच्या पोलीस स्टेशन स्तरावरील संबंधीत डिव्हॉईसवर पाठवितात. सदर एमडीटी डिव्हॉईस मध्ये कॉल प्राप्त होताच एमडीटी कर्तव्यावर हजर असणारे कर्मचारी यांनी तो कॉल पाहुन निर्धारित वेळेच्या आत पीडीतास तात्काळ मदत पोहोचविणे, हे या प्रकल्पाचा मुळ उद्देश आहे.
वेळेचे अचूक नियोजन झाल्याने यश
डायल ११२ च्या सिस्टमकरिता धुळे येथील नियंत्रण कक्ष येथे पाच अत्याधुनिक कॉम्प्युटर सिस्टम व एक सुपरवायझर सिस्टम कार्यान्वित करण्यात आले आहे. धुळे जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन येथे एकुण डायल ११२ चे एकुण ३५ चारचाकी वाहन व ३४ दुचाकी वाहन व त्यावर एमडीटी टॅब बसविण्यात आले आहे.या कार्यप्रणालीवर पोलीस अधीक्षक, व अपर पोलीस अधीक्षक यांचे नियंत्रण आहे. धुळे जिल्हा डायल ११२ प्रणालीमध्ये माहे जानेवारीचा-२०२४ चा पिडीतास पोलीस मदत पोहचविण्याचा रिस्पॉन्स टाईम हा १५.५१ मिनिटे असा होता. तो महाराष्ट्रातील एकुण ४५ घटकांपैकी शेवटच्या क्रमांकावर होता. त्यावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नाराजी व्यक्त करीत त्यामध्ये सुधारणा होणेकामी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले.त्यात सुधारणा होवुन माहे फेब्रुवारी चा रिस्पॉन्स टाईम हा १०.३५ मिनिटे एवढा कमी होवुन तो ४० व्या क्रमांकावर गेला. त्यानंतर परत पोलीस अधीक्षक यांनी आढावा घेवुन परिस्थितीमध्ये सुधारणा होवुन पिडीतास तात्काळ पोलीस मदत कशी पोहचेल यावावत नियोजन करुन त्याची तंतोतंत अंमलबजावणी होणेकामी प्रभारी अधिकारी सपोनि विलास ताटीकोंडलवार यांना सुचना व मार्गदर्शन केल्याने माहे मार्च २०२४ मध्ये पिडीतास पोलीस मदत पोचविण्याचा रिस्पॉन्स टाईम हा ३.५० मिनिट पर्यंत आला. एवढ्या कमी वेळेत थेट पिडीतास तात्काळ मदत पोहचविण्यासाठी धुळे जिल्हा हा महाराष्ट्रातील तिस-या क्रमांकाचा जिल्हा म्हणुन नामांकन प्राप्त झाला असुन महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर मीरा भाईंदर व व्दितीय क्रमांकावर मुंबई शहर यांना नामांकन मिळालेले आहे. तर नाशिक विभागात धुळे जिल्हा अव्वल ठरला आहे.
हेही वाचा :
Yavatmal – Washim Lok Sabha : भावना गवळी यांना उमेदवारी द्या, अन्यथा सामूहिक राजीनामे देणार; शिवसैनिक आक्रमक
K Kavitha: के. कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली
Akshay Kumar-Tiger Shroff : टायगरचं खिलाडी कुमारला एप्रिल फूल; राग येताच असं काही केलं की… (video)
Latest Marathi News डायल 112 प्रणाली अचूकपणे राबवल्याने धुळे जिल्हा राज्यात तृतीय स्थानी Brought to You By : Bharat Live News Media.