तब्बू, करिना कपूर, क्रितीच्या ‘क्रू’चा विकेंडला धमाका; ३० कोटींच्या घरात
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू, करिना कपूर व क्रिती सेनॉन यांचा ‘क्रू’ चित्रपट शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ग्रँड ओपनिंग केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने ८.७५ कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी ९.६ कोटींचा गल्ला जमवला. आता तिसऱ्या दिवशाची भरघोष अशी कमाईचे आकडे समोर आलं आहे. ( Crew Box Office Collection )
संबंधित बातम्या
Janhvi Kapoor : ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे…’;बोनी कपूरने जान्हवीच्या नात्याचा केला खुलासा
Crew Box Office Collection : तब्बू, करिना कपूर, क्रितीच्या ‘क्रू’ दोन दिवसांत १८ कोटींच्या घरात
Movie Crew Review : चोरी-दिवाळखोरी अन् मौजमस्तीनं भरलेला तब्बू ,क्रितीचा आला ‘क्रू’; पाहा रिव्ह्यू
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनचा ‘क्रू’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची बंपर कमाई होत आहे.
‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, ‘क्रू’ चित्रपटाने शुक्रवारी पहिल्या दिवशी भारतात ८.७५ कोटी रुपये कमावले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी, शनिवारी (दि. ३० मार्च ) रोजी देशात बॉक्स ऑफिसवर ९.६ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर तिसऱ्या आणि विकेंडला म्हणजे, रविवारी या चित्रपटाने १०. ६१ कोटी रुपयांची भरघोष अशी कमाई केली आहे. एकूणच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३० कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी झालाय.
यामुळे या चित्रपटाला विकेंडचा आणि शनिवार- रविवारचा चांगला फायदा झाल्याचे समजते. याशिवाय ‘क्रू’ चित्रपट हा या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा पार करेल असा दावा निर्मात्यांनी केला आहे. तर दुसरीकडे ‘क्रू’ चित्रपटाच्या कमाईचे आकडे अंदाजे वर्तविण्यात आले असून अद्याप खरी आकडेवारी समोर आलेली नाही.
‘क्रू’चे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे आणि त्यात कपिल शर्मा, दिलजित दोसांझ, सास्वता चॅटर्जी आणि राजेश शर्मा यांच्याही भूमिका आहेत. हा विनोदी चित्रपट पहिल्या दिवशी चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या ‘शैतान’शी टक्कर होत आहे; पण या चित्रपटाला तीन आठवडे झाले आहेत. ( Crew Box Office Collection )
View this post on Instagram
A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)
View this post on Instagram
A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)
Latest Marathi News तब्बू, करिना कपूर, क्रितीच्या ‘क्रू’चा विकेंडला धमाका; ३० कोटींच्या घरात Brought to You By : Bharat Live News Media.